आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधित श्रेणीत टाकण्याचे प्रकरण: सेबीला सरकारने विचारले- 9 जूनला दिली होती कंपन्यांची यादी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बाजार नियामक सेबीने शेल म्हणजेच बनावटी असल्याचे सांगत मंगळवारी ज्या १६२ कंपन्यांवर “प्रतिबंध’ लावले होते, त्यातील अनेक कंपन्यांनी लवादाकडे (सॅट) दाद मागितली अाहे. यामध्ये जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स आणि पार्श्वनाथ डेव्हलपर्सचा समावेश आहे. या कंपन्यांनी सेबीच्या आदेशावर “स्टे’ मागितला आहे. आदेश देण्याआधी चौकशी का करण्यात आली नाही, असा प्रश्न लवादाने सेबीला विचारला आहे. त्यावर कंपनी व्यवहार मंत्रालयाने सूचना दिली असून त्यानुसार आदेश जारी करण्यात आले असल्याचे सेबीने सांगितले आहे. यावर सॅटने विचारले की, कंपन्यांची यादी ९ जून रोजी भेटली होती, आदेश ७ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आले. दोन महिन्यांत काय तपास केला? यावर सेबी गुरुवारी उत्तर देऊ शकते.  यातील काही कंपन्या सेबीच्या विरोधात अपिलात जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. यातील १६२ कंपन्या  शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत. आता या कंपन्यांचे संस्थापक, संचालक भागीदारीची विक्री करू शकत नाही. शेअरमध्येही महिन्याच्या पहिल्या सोमवारी ट्रेडिंग होईल.

कंपन्यांत आठवडाभरात ट्रेडिंग  
यादरम्यान अर्थ मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सेबीच्या वतीने लवकरच एक अधिसूचना जारी करून या कंपन्यांना कागदपत्रे जमा करण्याचे आणि स्थिती स्पष्ट करण्याचे सांगण्यात येईल. आठवडाभरातच यातील डझनभर कंपन्यांमधील ट्रेडिंग सुरू होण्याची शक्यता आहे. नोटाबंदीदरम्यान काही कंपन्यांचा व्यवसाय अचानक वाढलेला दिसल्यामुळे ही  कारवाई करण्यात आल्याचेही त्या अधिकाऱ्याने   सांगितले. एसएफआयओ १७५ कंपन्यांची चौकशी करत असून आणखी १२४ कंपन्यांच्या विरोधात करचोरीप्रकरणी तपास सुरू आहे.  

एका दिवसात केवळ एका शेअरची खरेदी-विक्री 
गोयनका बिझनेस अँड फायनान्स कंपनीत ट्रेडिंग शेअरची संख्या खूप कमी असते. वर्षभरात एकाच शेअरची ट्रेडिंग झाली असल्याचे असे अनेक दिवस होते. तेदेखील ८४.२५ रुपयांच्या भावाने. 

केवळ १३ ट्रेडिंगमध्ये शेअरमध्ये ५६ टक्के घसरण 
अप्पू मार्केटिंग अँड मॅन्युफॅक्चरिंगचे शेअर १९ जुलै २०१७ रोजी ३१५ रुपयांवर ट्रेड होत होते.  त्यानंतर तेजीने घसरण झाली. शेवटची ट्रेडिंग ३७ रुपयांवर झाली होती.  

आठवड्याभरात शेअर ४४० वरून २४५ रुपयांवर पोहोचले 
नंतगॅलेंट इस्पातचे शेअर ३१ मार्च २०१७ रोजी ४४०.४० रुपयांवर होते. मात्र, त्यानंतर अचानक यामध्ये आठवड्याभर तेजीने घसरण होत राहिली. ७ एप्रिल २०१७ रोजी भाव २४५.९० रुपयांवर आले होते.
बातम्या आणखी आहेत...