आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ महागाई दर ५.४ टक्के

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- किरकोळमहागाई दरात सामान्य माणसाला अद्याप दिलासा मिळालेला नाही. जून महिन्यात किरकोळ महागाई दर चार महिन्यांतील सर्वात जास्त होता. जून २०१५ मध्ये किरकोळ महागाई दर ५.४ टक्क्यांवर गेला आहे. सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार खाद्य पदार्थांच्या किमतीमध्ये भाव वाढ झाली आहे. यामध्ये भाज्यांच्या किमती सर्वाधिक वाढल्या असल्याचे दिसून आले आहे. किरकोळ महागाई दरात वाढ झाल्याने रिझर्व्ह बँकेच्या वतीने व्याजदर कपात करण्याची आशा कमी झाल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
खाद्यपदार्थ झाले महाग
जूनमहिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंचा किरकोळ दर वाढला आहे. खाद्यपदार्थांच्या किमती ५.४८ टक्के वाढल्या आहेत. मे महिन्यात ४.८० टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. जून महिन्यात ग्रामीण भागातील महागाई ६.०७ टक्के नोंदवण्यात आली आहे. तीच मे महिन्यात ५.५२ टक्के होती. तर शहरी भागातील महागाई दर वाढून ४.५५ टक्के झाला आहे. गेल्या महिन्यात शहरी भागातील महागाईदर ४.४१ टक्के होता. भाज्यांच्या भावातदेखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जून महिन्यात किरकोळ बाजारात भाज्यांचे दर ५.७५ टक्क्यांनी वाढले आहेत. तर मे महिन्यात भाज्यांचे दर ४.६४ टक्के वाढलेले होते.
वीज दरात वाढ
जूनमहिन्यात इंधन आणि वीज दरात थोड्याफार प्रमाणात महागाईचा फटका बसला आहे. इंधन आणि विजेत किरकोळ महागाई दर जून महिन्यात ५.९२ टक्के नोंदवण्यात आला आहे. जो महिन्यात ५.९६ टक्के होता. कपडे आणि फुटवेअरमधील महागाई दर जून महिन्यात ६.३४ टक्के होता. या क्षेत्रात मे महिन्यात ६.१२ टक्के महागाई दराची नोंद करण्यात आली होती. तर जून २०१५ दरम्यान अवासीय महागाई दर ४.४८ टक्के राहिला, जो मे महिन्यात ४.६४ टक्के होता. तंबाखू आणि इतर मादक पदार्थांचा महागाई दर ९.७६ टक्के राहिला.
भाववाढ