आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Retailers Launch Elala To Fight With E Commerce Companies

ऑफलाइन रिटेलर्स येणार ऑनलाइन; ‘e-lala.com’ देणार ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ई-कॉमर्स वेबसाइट्‍स बोलबाला दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आता ई-कॉमर्स कंपन्यांचा धसका घेतल्याचे दिसत आहे. ऑनलाइन शॉपिंग आता फक्त मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही, हेच या मागील प्रमुख कारण आहे. आता छोट्या शहरांपर्यंतही ई-कॉमर्सची बिजे पोहोचली आहेत. या बिजांचे रोपटे व रोपट्यांचा भलामोठा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही, अशी शक्यता नाकारता येत नाही.

फेस्टिव्ह सीझन सुरु झाले आहे. बाजारपेठा सजायला लागल्या आहेत. परंतु बाजारात ग्राहक दिसत नसल्याचे पाहून रिटेलर्स संकटात सापडला आहे. दुसरीकडे, डिजिटल जमान्यात इंटरनेटच्या महाजालाने सर्व ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ई–मेलवरून आकर्षक ऑफर्सचा धडाका सुरू झाला आहे. आपण कधी पाहिलेही नाही की, नावही ऐकले नाही अशा अनेक वेबसाइट्‍सवरून शेकडो स्किम्सचा भडिमार सुरु झाला आहे. 'बिग सेल'च्या माध्यमातून 50 ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. त्यामुळे कधी ऑनलाइन शॉपिंगच्या नादाला न लागणारा ग्राहक देखील कुतूहलापोटी एखादी वस्तू खरेदी करताना दिसत आहे.

ई-कॉमर्सचा कारोभार तेजीत आहेत. परिणामी रिटेलर्सचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे रिटेलर्सनी आपली वेबसाइट ‘ईलाला डॉट इन’ येत्या पाच नोव्हेंबरला ल़ॉन्च करत आहे. रिटेलर्स असोसिएशन 'कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (सीएएआयटी) ई कॉमर्स पोर्टल ‘ईलाला डॉट कॉम’ला नागपूर येथून सुरु केले आहे. नोव्हेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात देशाची राजधानी दिल्ली-एनसीआरमध्येही सुरु करण्‍यात येणार आहे. ‘ईलाला डॉट इन’सोबत 'एचएफडीसी बॅंक' व 'मास्टर कार्ड'ने ऑनलाइन पेमेंटसाठी करार केला आहे.

‘ईलाला डॉट कॉम'मध्ये 50 हजार रिटेलर्स...
सीएएआईटीचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया यांनी सांगितले की, नागपूर येथे येत्या पाच नोव्हेंबरला पायलट लॉन्च करण्‍यात येणार आहे. त्यानंतर राजधानी दिल्लीत 'ईलाला' लॉन्च करण्‍यात येणार आहे. सुरुवातीला देश 50 शहरांत ही योजना सुरु करण्‍यात येणार आहे. असोसिएशनने मार्च 2016 पर्यंत शॉपिंग पोर्टलशी 50 हजार रिटेलर्स जोडण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. ई-कॉमर्स पोर्टलच्या माध्यमातून शहरापासून ते गावांपर्यंत ठोक व किरकोळ व्यावसायिकांना एकत्र आणण्याचा असोसिएशनचा मुख्य उद्देश आहे. सध्या देशातील जवळपास 40 हजार व्यावसायिक असोसिएशनशी जोडले गेल्याचे बी.सी.भरतीया यांनी सांगितले आहे.

'ईलाला डॉट कॉम' सेलर्सला कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. सद्यस्थितीत ई-कॉमर्स कंपन्या सेलर्सकडून 7 ते 35 टक्के कमिशन घेतात. स्टार्टअप्स व पार्टनरशिपचा विकास करण्यासाठी ईलाला.कॉमवर स्वतंत्र सेग्मेंट अर्थात आर्टिसन्स कॉर्नर देखील देण्यात येणार आहे. ईलाला.कॉमच्या प्लॅटफॉर्मवर व्यापारांचे स्वत:चे दुकान व वेबसाइट असणे गरजेचे आहे.

मागील वर्षी ऑनलाइन बिझनेस पाहाता ऑफलाइन रिटेलर्सला 30-40 टक्के आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे देशातील ऑफलाइन रिटेलर्सनी आता ऑनलाइन येणाचा निर्णय घेतला आहे. रिटेलर्स या योजनेत यशस्वी झाले तर 'फ्लिपकार्ट', 'अमेजॉन' व स्नॅपडील सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना 'ईलाला डॉट कॉम' हे तगडे आव्हान ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, ज्याचे असेल दुकान तो विकेल माल...