आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rich Lifestyle Of Indias Richest Person Mukesh Ambani

अशी आहे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानींची Luxurious लाइफ स्टाइल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा मान पुन्हा एखदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मिळवला आहे. फोर्ब्स मॅगझिनने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय ठरले आहेत. त्यांनी निव्वळ मालमत्ता सुमारे 20.6 अब्ज अमेरिकन डॉलर एवढी असल्याचे सांगितले जाते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्येही मुकेश अंबानी हे 36 व्या स्थानी आहेत. म्हणजे भारताबरोबर जगातील श्रीमंतांच्या यादीतही अंबानींचा दबदबा कायम आहे.

जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये होत असलेल्या घसरणीमुळे अंबानी यांच्या तेल आणि गॅस कंपन्यांच्या शेअरची घसरण होत असूनही अंबानींच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. भारतातील 84 अब्जाधीशांच्या यादीमध्ये अंबानी 2016 मध्येही आघाडीवर राहिले आहेत. त्या निमित्ताने मुकेश अंबानी यांच्या लक्झरी लाईफबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर वाचा.. विमाने, यॉट, 27 मजली बंगला आणि बरेच काही...