आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील सर्वात वयोवृद्ध श्रीमंत बिझनेसमन, कोटींमध्ये घेत होते सॅलरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली- हीरो मोटोकॉर्पचे फाउंडर ब्रिजमोहनलाल मुंजाल यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. ब्रिजमोहनलाल मुंजाल यांनी सन 1940 मध्ये मोटरसायकलचे स्पेअर पार्ट्स बनवण्याचे काम सुरु केले होते. देशातील सगळ्यात मोठ्या टू व्हीलर ऑटोमोबाइल कंपनीचे ते चेअरमन होते. परंतु, काही दिवसांपूर्वी त्यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांचे पूत्र पवन मुंजाल यांनी कंपनीचे सर्व सूत्रे आपल्या हाती घेतले होते.

'फोर्ब्स'ने काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात वयोवृद्ध उद्योगपतींची यादी जाहीर केली होती. त्यात ब्रिजमोहन लाल मुंजाल यांना अव्वल स्थान देण्यात आले होते. मुंजाल यांनी उभ्या केलेल्या कंपनीचा टर्नओव्हर 4 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

ऑटोमोबाइल इंडस्ट्रीतील पितामह
भावांपासून वेगळे झालेल्या ब्रिजमोहनलाल यांनी ऑटोमोबाइल इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. हीरो मोटोकॉर्प ही देशात नव्हे तर जगात सर्वात मोठी टू व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. ब्रिजमोहन लाल यांना ऑटोमोबाइल इंडस्ट्रीतील पितामह असे संबोधले जाते.

पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित
ब्रिजमोहनलाल मुंजाल यांना 2005 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. रीझनल बोर्ड ऑफ रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे मेंबर म्हणूनही त्यांने काम पाहिले होते. याशिवाय भारत सरकारची CII, AICMA सारख्या संस्थाचे ते सदस्य होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्रिजमोहनलाल मुंजाल यांचे निवडक फोटोज....