जोधपूर - प्रसिद्ध उद्योजक दीपक पारेख यांचा 18 अक्टोबरला वाढदिवस झाला. त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा मुलगा सिद्धार्थ याच्या लग्नाविषयी माहिती देत आहोत. देशातील एका मोठ्या लग्नसोहळ्यापैकी एक ठरलेला हा सोहळा अविस्मरणीय होता. त्या आठवणींना हा खास उजाळा...
एचडीएफसी बँकचे अध्यक्ष दीपक पारेख यांचा मुलगा सिद्धार्थ याचे लग्न राजस्थानच्या मेहरानगडमध्ये झाले. हे लग्न एवढे भव्य होते की, यातील पाहुणे चार्टर प्लेनने आले होते. सिद्धार्थ याची नवरी क्लेरी ओ नेल ब्रिटेनची रहिवाशी होती. लग्नासाठी तिचे नातेवाईक अमेरिका आणि ब्रिटेनमधून येथे आले होते. हे लग्न पहिल्यांदा ख्रिश्चन आणि नंतर हिंदू पद्धतीने झाले.
अंबानीपासून ते टाटापर्यंत अनेक झाले होते सहभागी, तीन दिवस चालला कार्यक्रम
या लग्नसोहळ्यामध्ये टाटा ग्रुपचे अध्यक्ष सायरस मिस्त्री, रिलायंस ग्रुपचे मुकेश अंबानी, एडीएजी ग्रुपचे अनिल अंबानी, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, जेट एयरवेजचे नरेश गोयल, शिवसेना सुप्रीमो उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या शिवाय 150 पेक्षा अधिक देशी-विदेशी पाहुणे विशेष विमानाने जोधपूरला आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा कोण कोण झाले होते सहभागी...