आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॉफ्टबँकेची फ्लिपकार्टमध्ये 16000 कोटींची गुंतवणूक, आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जपानी कंपनी सॉफ्ट बँकेच्या गुंतवणूक फंडाने फ्लिपकार्टमध्ये २.५ अब्ज डॉलर (१६,००० कोटी रुपये) ची गुंतवणूक केली आहे. भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीमध्ये झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. असे असले तरी फ्लिपकार्ट किंवा सॉफ्टबँक व्हिजन फंडाने गुंतवणूक करण्यात अालेल्या रकमेचा खुलासा केलेला नाही. मात्र, भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेल्या गुंतवणुकीपेक्षा ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे.  

या कराराशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सॉफ्टबॅक व्हिजन फंडाने १.५ अब्ज डॉलर (९,६०० कोटी रुपये) सरळ फ्लिपकार्टमध्ये गुंतवले असून उर्वरित एक अब्ज डॉलर (६,४०० कोटी रुपये) देऊन टायगर ग्लोबल मॅनेजमेंटमधील काही भागीदारी घेतली आहे. या गुंतवणुकीमुळे देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनीमध्ये सॉफ्ट बँकेची भागीदारी २० टक्के होईल. टायगर ग्लोबलमधून आलेले कल्याण कृष्णमूर्ती फ्लिपकार्टमध्ये सीईओ आहेत.  

भारत आणि फ्लिपकार्टसाठी हा खूप मोठा करार असल्याचे मत  फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी व्यक्त केले अाहे. सॉफ्टबँक समूहाचे अध्यक्ष मासायोशी सोन यांनी भारत हा “संधीची भूमी’ असल्याचे म्हटले आहे. फ्लिपकार्टने याच वर्षी एप्रिल महिन्यात गुंतवणूक जमा करण्याची घोषणा केली होती. त्या नंतर चीनमधील टेनसेंट, मायक्रोसॉफ्ट आणि ईबेने १.४ अब्ज डॉलरची (८,९०० कोटी रुपये) गुंतवणूक केली आहे. सॉफ्टबँक व्हिजन फंडाची गुंतवणूक जोडल्यास फ्लिपकार्टने आतापर्यंत पाच अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक मिळवली आहे. याचा वापर कंपनी व्यवसाय वाढवण्यासाठी करणार आहे.
बातम्या आणखी आहेत...