आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाजारात पाचशे रुपयांच्या 3 वेगवेगळ्या नोटा, घाईत जारी झाल्याचा आरबीआयचा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी सरकारचा नोटबंदीच्या निर्णयानंतर देशात निर्माण झालेल्या चलन कल्लोळात आणखी भर पडली आहे. चलनात नव्याने आलेल्या 500 रुपयांच्या नोटांंवरून लोकांंची परेशानी आणखी वाढली आहे. आरबीआयने दोन आठवड्यांपूर्वी 500 रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. 500 च्या 3 प्रकारच्या नोटा चलनात आल्याने लोकांना नवी डोकेदुखी झाली आहे. नोटांमध्ये छोटे-छोटेे बदल आहेत. पण, 'असली- नकली'वरून बहुतांश लोक कन्फूज झाले आहेत. दुसरीकडे, आरबीआयने 500च्या नोटांची छापाई करताना प्रिंटिंग मिस्टेक झाल्याचे मान्य केले आहे.

दरम्यान, मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला 500-1000 च्या नोटा चलनातून बाद झाल्याची अचानक घोषणा केली होती. त्यानंतर चलनात आधी 2000, नंतर 500 रुपयांची नोट चलनात आणली आहे.

# आरबीआयने काय म्हटले?
- आरबीआयच्या प्रवक्त्या अल्पना किल्लावाला यांनी सांगितले की, नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे 500 च्या नोटा छापताना त्यात प्रिटिंग मिस्टेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चलनात आलेली 500 रुपयांची नोट खरी आहे. नोटेचा रंग फिकट दिसत असल्या तरी ती खरी समजावे. लोक ती स्विकारू शकतात अथवा आरबीआयकडे ती वापस करू शकतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, 500 रुपयांच्या नोट छापताना काय झाली प्रिंटिंग मिस्टेक...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...