आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी संपत्ती मोजण्यासाठी नियमांची अधिसूचना जाहीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारने विदेशातील उत्पन्न आणि मालमत्तांची गणना करण्यासाठी नियमांची अधिसूचना काढली अाहे. विदेशात बँक खाते उघडल्यापासून आतापर्यंत जितके पैसे जमा करण्यात आले, ते सर्व एकत्र करण्यात येणार आहेत. याबाबत फक्त सध्या जमा असलेल्या पैशांच्या आधारावर निर्णय घेण्यात येणार नाही.

विदेशी संपत्तीत अचल संपत्तीसोबतच ज्वेलरी, हिरे, पुरातन वस्तूंचा संग्रह, चित्र, शेअर अशा सर्वांचा एकत्र विचार करण्यात येणार आहे. या मोजदादीमध्ये या सर्व वस्तूंची बाजारातील आताची किंमत मोजण्यात येणार आहे. हा नियम १ जुलैपासून लागू होणार आहे. हा नियम नुकताच संसदेने मंजूर केलेल्या काळ्या पैशाच्या कायद्याचा हिस्सा आहे. या अंतर्गत सरकारने काळा पैसा जाहीर करण्याच्या घोषणेसाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे.

अर्ज करावा लागेल
अधिसूचनेनुसार विदेशातील अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी ७ अर्ज भरावे लागणार आहेत. बँक खाते केव्हा आणि कुठे उघडले, केव्हा किती पैसे जमा केले याची माहिती द्यावी लागेल. स्थायी मालमत्ता आणि इतर मालमत्तेची माहितीदेखील यात असलेल्या मसुद्यानुसार भरावी लागणार आहे. या वस्तूंची बाजारातील किंमत सांगावी लागणार आहे. ज्वेलरीच्या बाबत त्यांची किंमत सांगावी लागणार आहे.