आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंग नोट बिघाडाचा अायफोन-7 मोबाइलला फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅलिफोर्निया- अॅपलने आयफोन-७ आणि प्लसला मोबाइल क्षेत्रातील सध्याच्या संधीचा चांगलाच फायदा होण्याची चिन्हे आहेत. सॅमसंग कंपनीने बॅटरीतील बिघाडामुळे नुकतेच त्यांचे गॅलेक्सी नोट-७ फोन परत मागवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आयफोन-७ शी स्पर्धा करण्यास सध्या अन्य कोणताही मोबाइल बाजारात नाही. सतत दोन तिमाहीत विक्री घटल्याचा फटका सहन करणाऱ्या अॅपलला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेत नोट-७ ची किंमत ६० हजारांच्या घरात असून आयफोन-७ ची किंमत सुमारे ४३ हजारांपासून सुरू होते. बॅटरीत होत असलेल्या स्फोटामुळे सॅमसंगने अमेरिकेसह १० देशांतील सुमारे २५ लाख गॅलेक्सी नोट-७ बाजारातून परत मागवले आहेत. त्यामुळे सॅमसंगच्या प्रतिष्ठेलाही तडा पोहोचला आहे. मूळ कोरियाची कंपनी असलेली सॅमसंग कंपनी बॅटरीतील बिघाड दुरुस्त करून नोट पुन्हा बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, आगामी आॅक्टोबर महिन्यात गुगलसुद्धा पिक्सल आणि पिक्सल एक्सएल हे मोबाइल लाँच करण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची आयफोन-७ किंवा नोट-७ शी स्पर्धा असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. भारतात नोट-७ ची विक्रीच झाली नसल्यामुळे येथून कंपनीने कोणतेही मोबाइल परत मागवले नाही. भारतात ऑक्टोबरपासून आयफोन-७ ची विक्री सुरू होईल. तज्ज्ञांच्या मते, बाजारात वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात सॅमसंग आणि अॅपलने गडबड केली. या गोंधळात सॅमसंगने नोट-७ ची योग्य चाचणी केल्यामुळे त्यांना याचा फटका बसला. अॅपलच्या उत्पादनातही अद्याप काही फिचर्स जोडण्यात आलेले नाही. पुढील महिन्यात हे फिचर्स मोबाइलमध्ये टाकले जातील.

गार्टनरनुसार, जूनच्या तिमाहीत ८६.२ टक्के स्मार्टफोन अँड्राइड आधारित होते. या तिमाहीत अॅपलने सुमारे कोटी फोनची विक्री केली. दोन वर्षांतील ही अॅपलची सर्वांत कमी विक्री असून त्यामुळे त्यांना महसुलात २३ टक्क्यांचा नुकसान झाला. जूनच्या तिमाहीत चीनमध्ये आयफोनची विक्री ३३ टक्क्यांनी घटली. मागच्या वर्षीच्या तुलनेत अॅपलचे शेअरसुद्धा टक्क्यांनी घसरले. आयडीसी या संशोधक कंपनीच्या अंदाजानुसार, २०१५ ते २०२० दरम्यान आयफोनच्या विक्रीत वार्षिक फक्त १.५ टक्क्यांची वाढ होऊ शकते.

जगभरात सध्या ९० कोटींपेक्षा अधिक आयफोन आहेत. त्यांच्या अॅप स्टोअरवरून आतापर्यंत १४० अब्ज डाऊनलोड करण्यात आले आहेत. जूनच्या तिमाहीत अॅपलच्या अॅप स्टोअरचा महसूल गुगल प्लेपेक्षा दुप्पट असल्याचा अॅपलचा दावा आहे. डाऊनलोडिंगमध्ये सर्वाधिक प्रमाण गेम्सचे आहे.
बातम्या आणखी आहेत...