आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सप्टेंबरच्या तिमाहीत सॅमसंगचा नफा तब्बल १७ टक्के घटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेऊल- जगातसर्वात जास्त स्मार्टफोन विकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीचा जुलै-सप्टेंबरमधील तिमाही नफा १७ टक्क्यांनी घटला आहे. कंपनीने लाँच केलेल्या गॅलेक्सी नोट-७ मुळे ही परिस्थिती उद््भवली आहे.

फोनमध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्यानंतर कंपनीने हे फोन परत मागवले त्यानंतर उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला. या प्रकारामुळे मागील वर्षीच्या तुलनेत नफा ४७० कोटी डॉलरवरून ३९० कोटी डॉलरपर्यंत घटला आहे. मागील आठ तिमाहीत हा आकडा सर्वात कमी आहे. गॅलेक्सी नोट-७ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आगीची घटना समोर आली तेव्हा सॅमसंगने स्मार्टफोनच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात फोन परत मागवले. परंतु त्यानंतरही आग लागण्याच्या घटना चालूच होत्या. त्यामुळे उत्पादनच थांबवण्यात आले. सॅमसंगने आयफोन-७ चे मार्केट तोडण्यासाठी या फोनची लाँचिंग केल्याचे बोलले जात होते. परंतु दोन महिन्यांच्या आतच नोट-७ भंगारमध्ये गेले. याच कारणामुळे मोबाइलच्या व्यवसायात सॅमसंगचा महसूल २०३ अब्ज डॉलरवरून घटून फक्त ८.७९ कोटी डॉलरवर राहिला. कंपनीच्या एकूण महसुलात मोबाइल व्यवसायाचा हिस्सा अर्ध्याहून अधिक आहे. एकूण विक्री टक्क्यांनी घटून ४२ अब्ज डॉलरवर राहिली.
बातम्या आणखी आहेत...