आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 मिनिटासाठी हा भारतीय तरुण बनला होता चक्क \'Google\'चा मालक; मिळाले 8 लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क- इंटरनेट आणि गुगल यांच्यापासून दूर जाणे आता कोणालाही शक्य नाही. साध्या साध्या गोष्टींसाठी आपल्याला गुगलची मदत घ्यावी लागते. 'गुगल'ही न थकता, कंटाळा करता आपल्या मदतीसाठी धावून येतो. गुगलचा आज 18 वा वाढदिवस आहे. ‘सेलिब्रेशन इज ऑन’ असे सांगणारे एक डुडलही आज 'गुगल'ने आपल्या युजर्ससाठी दिले आहे.

लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी 1998 मध्ये 'गुगल'ची सुरुवात केली होती. पण, तुम्हाला कदाचित माहीत नसावे की, गुगल आजवर सहा विविध तारखांना वाढदिवस साजरा करतो. या अनुशंगाने आम्ही आपल्याला गुगलची संबंधित एक रोचक माहिती घेऊन आलो आहे. ती म्हणजे एक भारतीय तरुण एका मिनिटासाठी चक्क 'Google'चा मालक बनला होता.

सन्मय बनला ‘गुगल डॉट कॉम’ डोमेनचा चक्क मालक
भारतात कच्छ भागातील रहिवासी असलेल्या सन्मय वेद या तरुणास जगप्रसिद्ध सर्च इंजिन गुगलने आठ लाख रुपये पुरस्कार म्हणून देऊ केले होते. याच्या मागे कारणही तसेच आहे. सन्मय ‘गुगल डॉट कॉम’ डोमेनचा चक्क मालक बनला होता. तोही फक्त एक मिनिटासाठीच!

कच्छ भागात मांडवी येथे राहणाऱ्या सन्मयने गुगल डोमेन सर्च करीत असताना पाहिले की गुगल डॉट कॉम (डोमेन नेम) चक्क विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याने तातडीने 12 डॉलरमध्ये हे डोमेन खरेदीही केले. यादरम्यान गुगलने ही विक्री सूचना मागे घेण्यापूर्वीच सन्मय वेबमास्टर टूल्सपर्यंत पोहचला होता. त्याबद्दल त्याला पुरस्कारही मिळाला.

एका मिनिटासाठी का होईना सन्मय चक्क या डोमेनचा मालक झाला होता. यापोटी गूगलने त्याला 4 लाख 7 हजार रुपयांची रक्कम पुरस्काराच्या स्वरूपात देण्याचे निश्चित केले.

पुढील स्लाइडवर वाचा, पुरस्काराची रक्कम केली आर्ट ऑफ लिव्हींग इंडिया फाऊंडेशनला दान
बातम्या आणखी आहेत...