आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाडेलांना आवडल्या ई-कॉमर्स कंपन्या, मायक्राेसाॅफ्ट वर्धापन दिन कार्यक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येणाऱ्या दशकात काॅम्प्युटिंग हाच शब्द परवलीचा ठरणार अाहे. अगदी अापल्या राेजच्या दैनंदिन कामात चालता फिरता काॅम्प्युटरशिवाय गत्यंतर नाही. फरक इतकाच की ताे अाता तुमच्या माेबाइलवर अाला अाहे. त्यामुळेच पर्सनल काॅम्प्युटरचा अनुभव माेबाइलवरच कसा देता येऊ शकेल याचा प्रयत्न अाम्ही करत अाहाेत. इतकेच नाही तर वेगळा पासवर्ड न राहता तुमचा चेहराच तुमचा पासवर्ड कसा बनेल यादृष्टीनेदेखील सध्या काम करत अाहाेत, असे मायक्राेसाॅफ्टचे भारतीय वंशाचे सीईअाे सत्या नाडेला यांनी तमाम उद्याेगपतींशी संवाद साधताना सांगितले.
मायक्राेसाॅफ्टच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त अायाेजित ‘मायक्राेसाॅफ्ट फ्युचर अनलिश्ड’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मायक्राेसाॅफ्टचे सीईअाे झाल्यानंतर नाडेला यांनी दुसऱ्यांदा भारतात भेट दिली. मुंबई अाणि पुण्यामध्ये डेटा सेंटरची उभारणी केल्यानंतर अाता मायक्राेसाॅफ्टने अापल्या सक्षम तंत्रज्ञानाच्या बळावर शिक्षण, अाराेग्य, व्यवसाय, स्टार्टअप, बँक अादी क्षेत्रात पंख पसरण्याचा इरादा पक्का केला अाहे. त्यादृष्टीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या या अाघाडीच्या कंपनीची मुंबईत वार्षिक बैठक झाली. या वेळी टाटा समूहाचे प्रवक्ते मुकुंद राजन, अॅक्सिस बँकेच्या प्रमुख शिखा शर्मा यांच्यासह विविध कंपन्यांचे तीन हजार अधिकारी उपस्थित हाेते.

विविध भाषांमध्ये साॅफ्टवेेअर विकसित करावे
प्रसाद भारताचे डिजिटल इंडियामध्ये रूपांतर करताना देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीचा विचार करून २२ कार्यालयीन भाषांसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज अाहे. डिजिटल सर्वसमावेशकता वास्तवात येण्यासाठी मायक्राेसाॅफ्टने विविध भाषांमध्ये साॅफ्टवेेअर विकसित करावे, अशी विनंती माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी या वेळी केली.

नाडेला यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे
- काॅम्प्युटिंगच्या प्रवासामध्ये येणाऱ्या काळात क्लाऊड काॅम्प्युटिंगला खूप महत्त्व येणार अाहे. त्यादृष्टीने इंटेलिजंट क्लाऊडची निर्मिती करणे हे अामचे उद्दिष्ट अाहे. यामुळे ‘डेटा’ या मालमत्तेचे रक्षण हाेऊ शकेल.
- उत्पादकता व व्यवसाय प्रक्रियेची पुनर्निर्मिती करणे आणि त्याचा सुसंवाद साधून इंटेलिजंट क्लाऊडची उभारणी तसेच पर्सनल काॅम्प्युटरमध्ये नवे स्थित्यंतर घडवून अाणणे हे सूत्र मायक्राेसाॅफ्ट जपणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...