आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौर ऊर्जेतून घर, कंपन्या वाचवताहेत पैसे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- सौरऊर्जेच्या प्रमुख केंद्राच्या रूपात मारवाड स्वत:ची ओळख निर्माण करत आहे. देश-विदेशातील कंपन्यांचे ६६५ मेगावॅटचे ६८ प्रकल्प येथे सुरू केले आहेत. एवढेच प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत म्हणजे तयार होत आहेत. शहराच्या आसपास दिसणारे हे सौरऊर्जेचे तरंग आता शहरापर्यंत पोहोचले आहेत. घर, कंपन्या तसेच सरकारी कार्यालयांच्या ज्या छतांचा पडीक व विनावापराचा म्हणून उल्लेख व्हायचा नेमकी ती छतेच आता कमाऊ झाली.

घर/ वासस्थान
१ किलोवॅटचे पॅनल प्रतिमहा हजार रु. वाचवत आहे. ५ वर्षांत होणारा खर्च वसूल.
१५० युनिट प्रतिमहा वीज १ केव्हीच्या पॅनलमधून
१.८४ लाख रुपयांचे सरकारी पॅनल, त्यावर ३० % अनुदान


शास्त्रीनगर निवासी रजनीश खिलनानींच्या घरात दररोज १२-१४ युनिट वीज लागत असे. तीन महिने पहिले छतावर १ केव्हीचे सोलर पॅनल बसवले, ज्यात दररोज ५ युनिट वीज तयार होते. रोज ३५ ते ४० रुपयांची वीज वाचते आहे. याविषयी सोलर पॅनल इन्स्टॉलेशनतज्ज्ञ नरेश माथुर सांगतात की, ८० हजार ते १ लाख रुपयांत एक किलोवॅटचे संपूर्ण पॅनल (खासगी कंपनीचे) छतावर ४ तुकड्यांत ८० वर्गफूट एरियात लावले जाते. ५-६ वर्षांत खर्च वसूल होतो.

पुढील स्लाइडवर वाचा, कार्यालय/कंपन्या देखील वाचवताहेत पैसा..
बातम्या आणखी आहेत...