आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लघु व्यावसायिकांना स्टेट बँकेचा मदतीचा हात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आघाडीवर असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाने लहान तसेच मध्यम व्यावसायिकांना मदत करण्यासाठी स्नॅपडील आणि डिजिटल पेमेंट क्षेत्रात कार्यरत असलेल्या पेपाल या कंपन्यांबराेबर करार केला आहे. या करारामुळे या व्यावसायिकांना सरसकट सर्व व्यवहार सुविधा देण्याबराेबरच स्वस्त कर्ज उपलब्ध हाेण्यास मदत हाेणार आहे.

स्नॅपडील भांडवली साहाय्य कार्यक्रमांतर्गत विक्रेता किंवा उत्पादकाला या मंचावर स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मदतीने आकर्षक दरात खेळते भांडवल उपलब्ध हाेऊ शकेल. महिला उद्याेजिकांना तर कर्जामध्ये पाव टक्का सवलत देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एक काेटी रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी काेणतेही तारण ठेवण्याची गरज नसेल. ही एक प्रकारे समान भागीदारी असेल. यामध्ये बँक ई-काॅमर्सच्या मंचावर विक्रेत्यांना आर्थिक साहाय्य पुरवेल, असे स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी स्नॅपडीलबराेबर झालेल्या परस्पर सामंजस्य करारानंतर बाेलताना सांिगतले. ग्राहकांना सुविधा पुरवण्यासाठी स्टेट बँकेने पेपाल या डिजिटल पेमेंट कंपनीशीदेखील करार केला आहे.
बातम्या आणखी आहेत...