आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SC To Hear Vijay Mallya Loan Settlement Case Today

विजय माल्यांचा 4000 कोटींच्या सेटलमेंटचा प्रस्ताव बॅंकांनी फेटाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 9000 कोटी रुपयांची थकबाकी न चुकवता लंडनला पळून गेलेल्या विजय माल्यांना सुप्रीम कोर्टाने जबरदस्त झटका दिला आहे. माल्यांचा 4000 कोटी रुपयांचा सेटलमेंटचा प्रस्ताव बॅंकांनी फेटाळला आहे. माल्यांनी बॅंकांना 4000 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, बॅंकांनी माल्यांचा प्रस्तावावर नाराजी व्यक्त केली आहे. यात सोयीस्कर पर्याय काढावा, अशी मागणी बॅंकांनी कोर्टाकडे केली आहे.
दुसरीकडे, माल्या यांची पत्नी व मुलाच्या मालमत्तेचे विवरण कोर्टासमोर सादर करावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने माल्यांच्या वकील सी.एस.वैद्यनाथन यांना दिले आहे. माल्यांनी बॅंकांना एक मोठी रक्कम द्यावी, असेही कोर्टाने म्हटले आहे.

दरम्यान, माल्यांनी बॅंकांना एक प्रस्ताव दिला होता. 2000 कोटी रुपये आता आणि उर्वरित 2000 कोटी रुपये 31 सप्टेंबर 2016 पर्यंत देण्यास तयार असल्याचे माल्यांनी म्हटले होते.

विलफुल डिफॉल्टर आहे माल्या....
- भारतीय स्टेट बॅंकेने मागील वर्षी माल्या यांना विलफुल डिफॉल्टर घोषित केले होते. यापूर्वी दोन बॅंकांनी देखील माल्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकले होते.
- माल्यासोबत त्यांची होल्डिंग कंपनी यूनाइटेड ब्रेव्हरीज होल्डिंग्ज व किंगफिशर एअरलाइन्सला विलफुल डिफॉल्टर घोषित केले होते.
- किंगफिशर एअरलाइन्स ऑक्टोबर 2012 पासून बंद आहे. डिसेंबर 2014 मध्ये किंगफिशरचे फ्लाइंग परमिट रद्द झाले होते.

बॅंकांसमोर काय आहे पर्याय?
- माल्यांनी देशातील 17 बॅंकांनी 6,963 कोटी रुपये कर्ज घेतले होते. व्याजासह ही रक्कम 9091 कोटी रुपये झाली आहे.
- 5500 कोटी रुपये माल्यांच्या फ्री अॅसेट्सला बॅंका टार्गेट करू शकतात.
- माल्यांनी बॅंकांनी को-ऑपरेट केले नाही तर त्यांची अॅसेट्स कोर्ट ऑर्डरच्या माध्यमातून सीझ करू शकतात.
- बॅंकांनी आतापर्यंत यूनाइटेड स्पिरिट्सचे 1244 कोटी रुपयांचे शेअर्स विक्री केले आहे.
- बॅंका माल्यांची प्रॉपर्टी विकून 2494 कोटी रुपये वसूल करण्याची तयारी करत आहेत.
- यूनाइटेड ब्रेव्हरीजमध्ये माल्यांनी माल्याचे 6724 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. यापैकी 3496 कोटी रुपये शेयर्स बॅंकांना मिळू शकतात.
- यूबी होल्डिंग्जमध्ये माल्यांचे 72 कोटी रुपये होल्डिंग आहे. यात 62 कोटी रुपये बॅंकांना मिळू शकतात.
- मंगळुरु केमिकल्स अॅण्ड फर्टिलायझर्समध्ये माल्यांची 25.74 कोटी रुपयांची भागिदारी आहे. यातून बॅंका 21 कोटी रुपये वसूल करू शकतात.
- 150 कोटी रुपये मुंबईतील एअरलाइन्स कंपनीचे हेडक्वार्टर्स किंगफिशर हाऊसच्या विक्रीतून बॅंकांना मिळू शकतात. मात्र, किंगफिशर हाऊसला खरेदीदार अद्याप मिळू शकलेला नाही.
- गोव्यातील माल्यांचा बंगला 'किंगफिशर व्हिला'च्या विक्रीतून 90 कोटी रुपये मिळू शकतात.

विदेशातून बॅंकाच्या संपर्कात आहेत माल्या...
- माल्याचे वकील सी.एस.वैद्यनाथन यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले होती की, माल्यांनी मंगळवारी (29 मार्च) व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे बॅंकांशी संवाद साधला. याआधीही माल्यांनी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे बँंकांशी दोनदा संवाद साधला होता.
- माल्यांचा प्रस्ताव वकील वैद्यनाथ यांनी सुप्रीम कोर्टाकडे बंद पाकिटात सुपूर्द केला.
- न्यायाधीश कुरियन जोसेफ व आरएफ नरिमन यांच्या खंडपीठाने बॅंकांना माल्यांच्या तडजोडीच्या प्रस्तावावर एक आठवड्यात उत्तर मागितले आहे.

भारतात कधी परतणार माल्या?, सुप्रीम कोर्टाचा सवाल
- विजय माल्या भारतात कधी परतणार? असा सवाल सुप्रीम कोर्टाने वकीलांना केला. त्यावर वैद्यनाथ म्हणाले, सध्या तरी माल्या व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारेच बॅंकांशी संवाद साधणार आहे.

2 मार्चला रफुचक्कर झाले माल्या...
- माल्या 2 मार्चला देशातून पलायन केले. माल्या सध्या लंडनमध्ये आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माल्यांना समन्स बचावले होते. 2 एप्रिलला हजर राहाण्याचे आदेश दिले होते.
- हैदराबाद एका कोर्टाने माल्यांविरुद्ध नॉन-बेलेबल वॉरंट बजावला होता. चेक बाउंस व थकबाकी न चुकवल्याप्रकरणी कोर्टाने वॉरंट बजावला होता.
- माल्यांना 13 एप्रिलपर्यंत कोर्टात हजर करण्‍याचे आदेश देण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, बँकांना माल्यांकडून किती वसूल करायचे ?