आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Schneider Electric Launches APC Mobile Power Pack

‘श्नायडर’चा ऊर्जासक्षम ‘एपीसी’ आधुनिक मोबाइल पॉवर पॅक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मोबाइल फोन स्मार्ट झाले असले तरी चार्जिंगची समस्या कायम आहे. ते लक्षात घेऊन श्नायडर इलेक्ट्रिकने ऊर्जासक्षम असे ‘एपीसी’ मोबाइल पॉवर पॅक हे सोयीचे चार्जिंग उपकरण बाजारात आणले आहे.

भारतामध्ये मोबाइल फोन आणि टॅब्लेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अनेक जण आपल्या या उपकरणांचा वापर संगीत, इंटरनेट पाहणे आणि इतर कारणांसाठी वापर करतात. त्यामुळे या उपकरणांची बॅटरी मोठ्या प्रमाणावर खर्च होते. हे लक्षात घेऊन बॅटरीचे आयुष्य वाढवण्याबरोबरच ऊर्जाबचत करणारा हा पॅक आजच्या टेकसॅव्ही ग्राहकांच्या पसंतीस पडेल, असे कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान व्यवसाय आणि सार्क विभागाचे उपाध्यक्ष निखिल पाठक यांनी सांगितले.
एपीसी मोबाइल पॉवर पॅक १५०० एमएच आणि २१०० एमएच अशा दोन प्रकारांत उपलब्ध आहे. पहिल्या प्रकारामध्ये स्मार्टफोन दोनदा आणि टॅब्लेट अर्धा चार्ज होऊ शकतो. दुसर्‍या प्रकारात स्मार्टफोन चार वेळा आणि टॅब्लेट एक वेळ पूर्ण चार्ज होऊ शकतो.

ठळक वैशिष्ट्ये
- ओव्हरचार्जिंग, ओव्हरडिस्चार्ज, शॉर्टसर्किटपासून संरक्षण - अल्ट्रा लो डार्क कंटेंट, ओव्हरलोड प्रोटेक्शन अशी काही सुरक्षा वैशिष्ट्येही आहेत. चार्जिंग पॉइंट्स उपलब्ध नसतानाही स्मार्टफोन्स, आयपॅड आणि टॅब्लेट चार्ज करण्यासाठी हे उत्पादन आदर्श आहे. - पूर्णपणे चार्ज झाल्यावर हा पॅक आपोआप बंद होतो. - युनिट चार्जिंगसाठी १.५ ए मिनी यूएसबी