आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उच्चप्रतीची सेवा देण्यास ‘दमरे’ कटिबद्ध : महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांची ग्वाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असताना दक्षिण मध्य रेल्वेच्या कार्यपद्धतीत मोठा बदल झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सातत्याने विविध उपाययोजना करून सर्वांना उच्चप्रतीची सेवा देण्यासाठी रेल्वे कटिबद्ध असल्याचे ‘दमरे’चे महाव्यवस्थापक रवींद्र गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे म्हटले आहे.

रेल्वे मार्गावरील वाढती वाहतूक पाहता विभागाने नवीन कल्पना राबवत प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले आहे. पूर्वी लाकडी आसने असलेले डबे होते. परंतु आता त्यात बदल करून कमी वजनाचे अत्याधुनिक डबे निर्माण करण्यात आले आहेत. याच विभागाने २४ डब्यांची गाडी अस्तित्वात आणली. प्रवाशांच्या मागणीनुसार आजही नवनवीन बदल केले जात आहेत. उपनगरीय रेल्वे प्रणालीत २००३ मध्ये बदल करून मल्टी ट्रान्सपोर्ट सिस्टिम सर्व्हिस लागू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात ४७ किलोमीटरपर्यंत या सेवेचा विस्तार झाला.

यात दरदिवशी दीड लाख प्रवाशांना याचा फायदा होतो. सध्या फलकनुमा - सिकंदराबाद – लिंगमपल्ली आणि हैदराबाद – लिंगमपल्ली या मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी ९३ किलोमीटरपर्यंत या सेवेचा विस्तार होणार आहे. विजेवर गाडी धावण्याच्या बाबतीतही दमरे पुढे आहे. आजघडीला २,४७९ किलोमीटरच्या मार्गावर विजेवर गाड्या धावतात. यात ७० टक्के मालाची व ५४ टक्के प्रवासी वाहतूक केली जाते. आणखी एक हजार किलोमीटरवर याचे काम सुरू आहे. टिकीट प्रणालीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून संगणकीकरण करण्यात आले आहे. ६० ते ७० टक्के टिकीट ऑनलाइन पद्धतीने बुक होतात. रेल्वे स्थानकावरही ऑटोमॅटिक टिकीट मशीन, स्टेशन टिकीट बुकिंग सेवक, जनसाधारण टिकीट बुकिंग सेवा पुरवली जात आहे. स्थानकावर वातानुकूलित प्रतीक्षालय, एलईडी लायटिंग, ८७४ इको फ्रेंडली बाथरूम बसवण्यात आले. २०१६-१७ मध्ये यात आणखी ३,९०० बाथरूमची भर पडणार आहे.

सोशल मीडियाचा वापर
सोशल मीडिया, मोबाइल अॅपच्या आधारावर प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यावर विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शिवाय सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसही नेहमी सज्ज असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...