आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • SEA To Move FSSAI, ASCI Against Patanjali Mustard Oil Ad

इतर कंपन्यांचा पतंजली ब्रँडच्या मोहरी तेल जाहिरातीला विरोध, तक्रार करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खाद्य तेल बनवणाऱ्या कंपन्या योग गुरू रामदेव यांच्या पतंजलीच्या विरोधात तक्रार करण्याची तयारी करत आहेत. "कच्च्या घाण्याचे मोहरीचे तेल' असा उल्लेख या तेलाच्या जाहिरातीत करण्यात आला असून ही जाहिरात अपमानजनक असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. या कंपन्यांची संस्था सॉल्वेन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशनने (एसईए) खाद्य सुरक्षा नियामक एफएसएसएआय आणि जाहिरातींवर लक्ष ठेवणारी एएससीआयकडे याची तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे.

असोसिएशनच्या वतीने या संदर्भात पुराव्यासह विस्तृत अहवाल पतंजलीला पाठवण्यात आला असून ही जाहिरात काढण्याची मागणी करण्यात आली होती. तरीदेखील दूरचित्रवाणी तसेच वृत्तपत्रात ही जाहिरात प्रकाशित होत आहे. त्यामुळे आता असोसिएशनने एफएसएसएआय आणि एएससीआयकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला अाहे. असोसिएशनने कच्च्या घाण्यात मोहरीचे तेल बनवणाऱ्या आपल्या इतर सदस्यांनादेखील नियामकांकडे तक्रार करण्याचे सांगितले आहे.

जाहिरातीत चुकीची माहिती
पतंजलीने जाहिरातीत इतर ब्रँडच्या तेलात भेसळ असल्याचे सांगितले आहे. वास्तविक या जाहिरातीत कोणत्याही ब्रँडचे नाव घेण्यात आलेले नाही. या जाहिरातीत चुकीची माहिती दिली गेली असल्याचा आरोप असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, जाहिरात तथ्यांवर आधारित : पतंजली