आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sebi Asks Firms Without Women Directors To Pay Rs50,000 Fine

महिला संचालक नसल्यास ५० हजार दंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महिला संचालकांची नियुक्ती न करणार्‍या कंपन्यांना किमान ५० हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे. भांडवल बाजार नियामक सेबीने ही घोषणा केली आहे. सप्टेंबरपर्यंत महिला संचालकाची नियुक्ती न केल्यास प्रवर्तकांवर कारवाई होईल, असा इशाराही सेबीने दिला आहे. सेबीने या कंपन्यांकडून दंड वसुलीचे निर्देश बाजारांना (एक्स्चेंज) दिले आहेत. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) १००० हून जास्त आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) १८० कंपन्यांनी अद्याप महिला संचालकाची नियुक्ती केलेली नाही.

सेबीने दंडाचे चार टप्पे ठेवले आहेत. काळानुसार दंड वाढत जाणार आहे. येत्या ३० जूनपर्यंत नियमाचे पालन करणार्‍या कंपन्यांना केवळ ५० हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात नियुक्ती करणार्‍या कंपन्यांना ५० हजार रुपयांशिवाय दिवसामागे १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. सप्टेंबरनंतर महिला संचालकाची नियुक्ती करणार्‍या कंपनीला १.४२ लाख रुपये दंडाशिवाय दिवसामागे ५००० रुपये द्यावे लागतील. याशिवाय सेबी प्रवर्तकांवरही कारवाई करू शकते. सेबीच्या सूत्रांनुसार, महिला संचालक नसणार्‍या बहुतांश कंपन्या छोट्या आहेत. त्यामुळे प्रारंभी कमी दंड ठेवण्यात आला आहे. असे असले तरी किमान ३२ सरकारी कंपन्या अशा आहेत, जेथे एकही महिला संचालक नाही.