आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Self help Groups Of Women To Provide Food On Indian Railway

रेल्वेत खाद्यान्न पुरवठ्याची बचत गटांना संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महिला स्वयंसहायता गटांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वे पुढे आली आहे. रेल्वेमध्ये खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यासाठी तसेच आपल्या ई-केटरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने नवी योजना बनवली आहे. यामध्ये काही महिला बचत गटांना संधी देण्यात येणार आहे. यामुळे महिलांना घरगुती व्यवसायाला अधिक मोठे करण्याची संधी मिळणार आहे.

या नव्या योजनेनुसार महिला बचत गटाचे नाव आणि अन्नासह त्याच्या किमती आयआरसीटीसीच्या ई-केटरिंग वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बचत गटाच्या वतीने दिलेल्या यादीतून प्रवासी अन्नाची निवड करू शकतील. यामुळे बचत गटांना चिरंतन विकासाची संधी मिळणार असल्याचे मत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

महिला सशक्तीकरण योजनेचा एक भाग म्हणून आम्ही यावर काम करत असल्याचे आयआरसीटीसीचे अध्यक्ष ए. के. मनोचा यांनी सांगितले.