आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सची २३८ अंकांनी गटांगळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी इन्फाेसिसने चांगली अार्थिक कामगिरी करूनही फारसा फरक पडला नाही. बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्यात अाैषध कंपन्यांच्या समभागांना माेठा फटका बसून सेन्सेक्स २३८ अंकांची गटांगळी खात २८,१८२.१४ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात जीएसटी अाणि भूसंपादन या दाेन महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी मिळते की नाही याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले अाहे. त्यामुळे इन्फाेसिसने चांगला नफा कमावूनही त्याकडे गुंतवणूकदारांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्यात स्थावर मालमत्ता, हेल्थकेअर, तेल अाणि वायू तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागांना फटका बसला, परंतु माहिती तंत्रज्ञान समभागांना मागणी अाली.

सन फार्मा या अाघाडीच्या कंपनीने अार्थिक
निकाल फारसा चांगला राहणार नाही, असे संकेत दिल्यामुळे अाज या कंपनीसह अन्य अाैषध कंपन्यांच्या समभाग विक्रीवर गुंतवणूकदार तुटून पडले. सन फार्माच्या समभाग िकमतीत तर १५ टक्क्यांनी घट झाली. पण त्यातच इन्फाेसिसच्या निव्वळ नफ्यात वार्षिक अाधारावर पाच टक्क्यांनी वाढ हाेऊन ताे जूनअखेर संपलेल्या तिमाहीत ३०३० काेटी रुपयांवर गेला िशवाय महसुलातील कामगिरी चांगली हाेण्याचे संकेत

कंपनीने दिले अाहेत. त्यामुळे अन्य माहिती तंत्रज्ञान समभागांना देखील मागणी अाली.
पहिल्या तिमाहीत अातापर्यंत जाहीर झालेल्या कंपन्यांच्या अार्थिक निकालामध्ये संमिश्र कल असल्यामुळे स्पष्ट दिशा मिळत नाही, परंतु कंपन्यांचे निकाल कमी लागतील, अशी अपेक्षा अाहे, असे मत जिअाेजित बीएनपी परिबा फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशाेधन प्रमुख विनाेद नायर यांनी व्यक्त केले.

युराेप शेअर बाजारात संमिश्र वातावरण हाेते, पण अाशियाई शेअर बाजारात मात्र तेजीची धारणा हाेती. अमेरिकेच्या शेअर बाजारात देखील चांगली वाढ झाली.
निफ्टीचा निर्देशांक ७४ अंकांनी घसरला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २८,३९१.८२ अंकांच्या खालच्या पातळीवर उघडला. पण भांडवल बाजारात येणारा भक्कम निधीचा अाेघ अाणि इन्फाेसिसच्या अार्थिक कामगिरीने दिलासा दिल्यामुळे सेन्सेक्स लगेच सावरला, परंतु कामकाजाच्या अखेरच्या सत्रात झालेल्या नफारूपी विक्रीनंतर सेन्सेक्स २३७.९८ अंकांनी घसरून २८,१८२.१४ अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील िनफ्टीचा िनर्देशांकही ७४ अंकांनी घसरून ८५२९.४५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बातम्या आणखी आहेत...