आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रीस प्रभावाने सेन्सेक्सची साप्ताहिक वाढ कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ग्रीस अाणि युराेझाेनदरम्यान झालेल्या बेल अाऊट करारामुळे या अाठवड्यात बाजाराला माेठा दिलासा मिळाला. ग्रीस संसदेने आर्थिक सुधारणा करण्यास मान्यता दिल्यामुळे बाजारात खरेदीचा उत्साह वाढला. त्यामुळे बाजारात लक्षणीय सुधारणा हाेऊन सेन्सेक्सने २८ हजार, तर निफ्टीने हजार अंकांच्या पातळीला पुन्हा एकदा स्पर्श केला.
ग्रीसमधील सुधारणेच्या परिस्थितीमुळे बाजाराने सुटकेचा निश्वास साेडला असला, तरी किरकाेळ महागाईत वाढ झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी हाेण्याच्या अपेक्षा काहीशा मावळल्या आहेत. त्यातच घाऊक महागाई नकारात्मक पातळीवर असल्यामुळे बाजाराच्या अाशा कायम अाहेत.

इराण आणि सहा देशांमध्ये झालेल्या अणुकरारामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असून त्यामुळेदेखील बाजाराला अाधार मिळाला आहे. संरक्षण,विमा, ई-कॉमर्ससारख्या क्षेत्रात सुलभ गुंतवणूक शक्य केंद्रीयमंत्रिमंडळाने थेट विदेशी गुंतवणुकीच्या "कंपोझिट कॅप’ला मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतात आता विदेशी गुंतवणूक करणाऱ्यांना संरक्षण, विमा, ई-कॉमर्ससारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सुलभपणे गुंतवणूक करता येईल. त्याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला.
शेअर बाजाराचा िनर्देशांक २७,७३९.३२ अंकांच्या कमाल पातळीवर उघडला. िदवसअखेर सेन्सेक्स ८०१.९१ अंकांची उसळी घेत २८,४६३.३१ अंकांच्या चांगल्या पातळीवर बंद झाला. िनफ्टीदेखील २४९.३० अंकांनी वाढून ८६०९.८५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.
उलाढालीत वाढ
माहितीतंत्रज्ञान, तंत्रज्ञान, अाराेग्य आणि ग्राहकाेपयाेगी वस्तू समभागांची बाजारात दणकून खरेदी झाली. िमडकॅप आणि स्माॅलकॅप समभागांच्या खरेदीतही गुंतवणूकदारांनी स्वारस्य दाखवले. मुंबई शेअर बाजारातील उलाढाल अगाेदरच्या अाठवड्यातील १५,३८०.३३ काेटी रुपयांवरून घटून १३,९२६.५० काेटी रुपयांवर अाली, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील उलाढालही ८४,२४१ काेटी रुपयांवरून ७४,२३९.४५ काेटी रुपयांवर अाली.
बातम्या आणखी आहेत...