आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१.९६ लाख कोटी बुडाले, सेन्सेक्स ३१८ अंकांनी घसरला, १९ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी देशातील शेअर बाजार १९ महिन्यांतील नीचांकी पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील ३० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३१८ अंकांच्या घसरणीसह २४,४५५ च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील ५० शेअरचा समावेश असलेला प्रमुख निर्देशांक निफ्टी ९९ अंकांच्या घसरणीसह ७४३७ च्या पातळीवर बंद झाला.
सर्वात जास्त घसरण बँकिंग, मेटल, आॅटो, इन्फ्रा आणि रिअॅल्टी क्षेत्रात दिसून आली. वास्तविक आयटी क्षेत्र वाढीसह बंद होण्यात यशस्वी झाले. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १ लाख ९६ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
आयटी क्षेत्रात वाढ
भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी झालेल्या व्यवहारात जवळपास सर्वच क्षेत्रांत घसरण नोंदवण्यात आली. असे असले तरी गुरुवारप्रमाणे शुक्रवारीदेखील आयटी क्षेत्रात सुमारे ०.२१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. यामध्ये इन्फोसिसमध्ये दोन टक्क्यांची वाढ नोंदवण्यात अाली आहे. तसेच सुझलॉन एनर्जीमध्ये तीन टक्के वाढ नोंदवली गेली.
या क्षेत्रात घसरण
- बँकिंग निर्देशांकात ५.८२ टक्क्यांची घसरण
- ऑटो क्षेत्रात दोन टक्क्यांची घसरण
- इन्फ्रा क्षेत्रात ३.४० टक्क्यांची घसरण { मेटल क्षेत्रात तीन टक्के घसरण
- मीडिया क्षेत्रात ३.६७ टक्क्यांची घसरण
यामुळे झाली घसरण
चीनमधील कर्जाच्या अाकडेवारीत नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये घट झाल्यामुळे चीनच्या बाजारात विक्रीचा मारा झाला. त्याचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला.जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ३० डाॅलरच्याही खाली गेल्यामुळे, त्याचा सरळ परिणाम बाजारावर दिसून आला. जागतिक संकेत नकारात्मक आल्यामुळे एफआयआयनेही मोठ्या प्रमाणावर विक्री केली.