आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्चमध्ये सेवा क्षेत्राची कामगिरी घसरली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सेवा क्षेत्राच्या वाढीच्या चक्राला मार्चमध्ये ब्रेक लागला आहे. मात्र, नव्या ऑर्डर मिळण्याचे प्रमाण वाढल्याने आगामी काळ चांगला असल्याचे संकेत मिळाले आहेत. देशातील सेवा क्षेत्राच्या कामगिरीचे मासिक मूल्यांकन करणार्‍या एचएसबीसी इंडिया सर्व्हिसेस बिझनेस इंडेक्समधून ही माहिती समोर आली. मार्चमध्ये हा निर्देशांक घटून ५३.० वर आला. फेब्रुवारीत हा निर्देशांक ५३.९ या पातळीत होता. हा निर्देशांक ५० च्या वर असणे व्यवहारवाढीचे, तर ५० पेक्षा खाली आल्यास व्यवहार घटल्याचे संकेत देतो.

एचएसबीच्या सर्वेक्षणानुसार पेट्रोल व वाहतुकीचे दर वाढले आहेत. यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. ही वाढ जून २०१४ नंतरची सर्वाधिक आहे. हे सर्वेक्षण करणारी कंपनी मार्केटच्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लीमा यांच्या मते, मार्च मध्ये देशाच्या सेवा क्षेत्रातील कारभार आणि हालचालीत चांगली वाढ दिसून आली आहे.

नोकर्‍यांत तेजीची अपेक्षा
सेवा क्षेत्रातील कारभार गतीने वाढतो आहे. कंपन्यांत आगामी काळात मोठ्या प्रमाणात नोकरभरती सुरू होण्याची शक्यता आहे. - पॉलियाना डि. लिमा, अर्थतज्ज्ञ, मार्केट