आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर्स, फंड एसआयपीतून एफडीपेक्षा दुप्पट परतावा; तेजीने झळाळलेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सरत्या संवत्सरात शेअर बाजारातील सेन्सेक्स व निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी बँकांतील मुदत ठेवींच्या तुलनेत दुप्पट परतावा दिला.  गतवर्षीची दिवाळी ते यंदाची दिवाळी या वर्षभरात  निफ्टीने १८.२० टक्के, तर सेन्सेक्स निर्देशांकाने  १६.६१ टक्के परतावा दिला. आगामी संवत्सर २०७४ गुरुवारी सुरू होत असून त्यासाठी शेअर बाजारात खास मुहूर्ताचे सौदे होणार आहेत. याच काळात म्युच्युअल फंडांनीही भरभरून परतावा दिला अाहे. येत्या संवत्सरासाठी योग्य निवड, नियोजन केल्यास असाच परतावा मिळेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.  

गुंतवणूक सल्लागार विश्वनाथ बोदडे म्हणाले, नव्या संवत्सरात जीएसटीच्या माध्यमातून सरकारचे उत्पन्न वाढेल. आर्थिक विकास दर चांगला राहील. येणारे संवत्सर शेअर बाजारासाठी सकारात्मक राहील. त्यातही वित्त व सेवा, लॉजिस्टिक, वाहन, एफएमसीजी व धातू क्षेत्रात तेजीची शक्यता आहे. या समभागातून चांगल्या परताव्याची अपेक्षा आहे. सेबी मान्यताप्राप्त गुंतवणूक सल्लागार लक्ष्मीकांत कोरडे यांनी सांगितले, आगामी काळ सकारात्मक आहे. म्युच्युअल फंडात (एसअायपी) गुंतवणूक केल्यास चांगल्या रिटर्नची अपेक्षा आहे.
बातम्या आणखी आहेत...