आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shell Acquisition Of BG Group Will Create Giant Operator Of LNG Ships

शेल ४.३४ लाख कोटींत खरेदी करणार बीजी ग्रुप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडची तेल व गॅस कंपनी रॉयल डच शेलने इंग्लंडमधील बीजी ग्रुप कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सौदा ७० अब्ज डॉलरचा (४.३४ लाख कोटी रुपये) होईल. शेल आणि बीजी या दोन्ही कंपन्यांनी या व्यवहाराला दुजोरा दिला आहे. हा व्यवहार २०१६ मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

वर्ष २०१४ च्या उत्पन्नानुसार शेल ही जगातील सर्वात मोठी तेल व गॅस कंपनी आहे. मागील वर्षी कंपनीचे उत्पन्न ४७७ अब्ज डॉलर होते. चीनची सायनोपेक कंपनी ४६८ अब्ज डॉलरसह दुसर्‍या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेल किमती वर्षभरात निम्म्याने घटल्याच्या काळात हे अधिग्रहण होत आहे.