आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी करत होता मुंबईत चौकीदारी; आज जमीलच्या बुटावर नाचते बॉलिवूड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/मुंबई- बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील जमील शाह हा कधी काळी मुंबईत चौकीदारी करून आपला पोटापाण्याचा खर्च भागवत होता. आज जमीलच्या बुटांच्या टोकावर आमिर खान, सलमान खान तसेच कतरीनासारख्या अॅक्ट्रेस डान्स करतात.

जमीलला रोजगारासाठी कुठे कुठे नाही ती भटकंती करावी लागली. चला तर मग पाहून या जमील शाहची यशोगाथा...

आमिर खानने फिल्म 'धूम-3'मध्ये केला होता टॅपिंग डान्स....
- रोजगाराच्या शोधात जमीलने मुंबई गाठली. त्याआधी त्याने बिहारमधील दरभंगा, देशाची राजधानी दिल्ली इतकेच नव्हे तर बंगळुरुमध्येही नशीब आजमावले होते.
- मुंबईत सुरुवातीला 2000 रुपये मासिक पगाराची चौकीदाराची नोकरी केली
- जमील याने सांगितले की, त्याला डान्सर व्हायचे होते. परंतु डान्सिंग क्लासची फीज द्यायला त्याच्याकडे रुपये नव्हते.
- जमीलमधील प्रतिभा सगळ्यात आधी संदीप सोपारकर यांना दिसली होती. जमील त्यांना आपला गुरु मानतो.
- जमीलने सांगितले की, डान्सिंग शूज प्रचंड महागडे असतात. 10000 ते 2 लाख अशी या शूजची किंमत असते.
- भारतात शक्यतो डान्सिंग शूज उपलब्ध होत नाही. अनेक डान्सर शून इंग्लंडहून मागवतात.
- जमीलने 'सेम तू सेम' डान्सिंग शूज बनवून संदीप सोपारकर यांना भेट केले.
- जमीलने बनवलेले शूज पाहून सोपारकर मोहीत झाले आणि तेव्हापासून 2007 पासून डान्सिंग शून बनवण्याचा सिलसिला सुरु झाला.
- आमिर खानने फिल्म 'धूम-3'मध्ये जमीलने बनवलेले डान्सिंग शूजवर टॅपिंग डान्स केला होता.

पुढील स्लाइडवर याचा, मुंबईतील धारावीत जमीलचे वर्कशॉप
बातम्या आणखी आहेत...