आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन महिन्यांत 7500 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, 30 हजारांवर येईल दर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मुल्य कमी झाल्याने सोन्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. चांदीच्या दरात तीन महिन्यांत तब्बल साडे सात हजार रुपयांची घट झाली आहे.

मागील पाच वर्षांत पहिल्यांदा चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. सप्टेंबरपर्यंत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली आणि चीनची मागणी न वाढल्यास चांदीचे दर प्रति किलो 30 हजारवर येतील असे भाकीत विशेषज्ज्ञानी वर्तवले आहे. चांदीच्या दरात मोठी घट होण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरचे मूल्य कमी झाले आहे, तसेच ग्रीसमधील संकट, चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदी व कच्च्या तेलाच्या दरात झालेली घट हे प्रमुख कारण सांगितले जात आहे.

17 सप्टेंबरला अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक
अमेरिकन फेडरल रिझर्व्हची येत्या 17 सप्टेंबरला बैठक होणार आहे. व्याजदरवाढीबाबत या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. चीन हा देशातील सर्वात मोठा ग्राहक आहे. मात्र, बाजाराचा एमसीएक्स चांदी 40,997 रुपये प्रति किलो स्तरावर बंद झाला. परिणामी बुधवारी चांदीचे दर प्रति किलो 33,479 रुपये होते.
अमेरिकेत व्याजदर घटल्याने स्वस्त झाले सोने-चांदी
कोटक कमोडिटीचे एव्हीपी अरविंद प्रसाद यांनी सांगितले की, अमेरिकेत घटलेल्या व्याजदरामुळे सोने-चांदीच्या दरात मोठा चढ-उतार पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदी ही मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आंतरराष्‍ट्रीय बाजारात दरांबाबत अस्थिरता निर्माण झाली आहे. भविष्यात ही स्थिती कायम राहिल्यास चांदीच्या दरात मोठी घसरण होणार आहे.

सोना आणि बेस मेटलचे दर घसरल्यामुळे आणखी वाढेल दबाब
चांदीच्या दरावर सोने आणि बेस मेटल्सचा प्रभाव असतो. सोने आणि चांदीच्या दरांचा नेहमी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो. दुसरे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे चांदी स्वस्त झाल्याने हा धातू इतर धातुंच्या श्रेणीत मोडला जात आहे. चांदीचा सर्वाधिक वापर (55 टक्के) इंडस्‍ट्रीत होतो. त्यामुळे यंदाचे वर्ष चांदीसाठी निरुत्साही ठरले असल्याचे मत केडिया कमोडिटीचे एमडी अजय केडिया यांनी मांडले आहे.

जानेवारी 2015 मध्ये आंतरराष्‍ट्रीय बाजारात चांदी 18.48 डॉलर प्रति पौंडवर पोहोचली होती. मात्र, जागातिल प्रमुख बॅंकांनी आले आर्थिक धोरणात सुधारणा केल्याने सोने-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. भविष्यात चांदीचे दर 30,000 रुपये प्रति किलो घसरु शकतात.

पुढील स्लाइडवर वाचा, चांदीची मागणी वाढणार...