आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैसे काढण्याची मर्यादा वाढवा : सीतारमण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीमुळे उत्पादन प्रक्रियेवर परिणाम झाल्यामुळे चिंतेत असलेल्या निर्यातकांनी वाणिज्य मंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली अाहे. निर्यातदारांसाठी पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्याची मागणी आपण अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासमोर ठेवणार असल्याचे आश्वासन त्यांनी निर्यातदारांना दिले आहे. निर्यातदार प्रमोशन परिषदेच्या प्रतिनिधींसोबत सीतारमण यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निर्यातदारांनी वाणिज्य मंत्र्यांसमोर आपल्या अडचणी मांडल्या.
नोटबंदीमुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती उद्योजकांनी दिली. नगदी पैसे काढण्याची मर्यादा घालण्यात आल्यामुळे निर्यातकांना कच्चा माल विकत घेण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सध्या नगदी पैसे काढण्याची मर्यादा ५०,००० रुपयांवरून वाढवून ५ लाख रुपये करण्याची मागणी निर्यातदारांनी केली आहे.

या बैठकीनंतर सीतारमण यांनी या संबंधीची माहिती दिली. कारपेट आणि हँडलूम सारख्या कामगारांवर आधारित उद्योग क्षेत्रात पूर्णपणे नगदी पैशावर व्यवहार होत असल्याचे सीतारमण यांनी सांगितले. त्यामुळे नगदी पैसे काढण्याची मर्यादा वाढवून ३, ४ किंवा पाच लाख रुपये करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाविषयी आपण अर्थमंत्रालयासोबत चर्चा करणार असल्याचे आश्वासनही सीतारमण यांनी उद्योजकांना दिले आहे.
बातम्या आणखी आहेत...