आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत करा हे पाच छोटे बिझनेस, तुम्ही कमावू शकतात लाखो रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी चार दिवसांवर आली आहे. फेस्टिव सीझनमध्ये तुम्ही कमी गुंतवणुकीत एखादा छोटा बिझनेस सुरु करून मोठा नफा कमावू शकतात. सरकारी कर्मचार्‍यासोबत खासगी नोकरदारांना दिवाळीला बोनस मिळतो. त्यामुळे ते दिवाळीला मोठी खरेदी करतात. बाजारात या काळात तेजी पाहायला मिळते.

कमी गुंतवणुकीत करण्यासारखे अनेक छोटे बिझनेस आहेत. या पॅकेजमधून आम्ही अशाच काहीशा बिझनेसविषयी माहिती घेवून आलो आहे. यंदाच्या दिवाळीत हे बिझनेस सुरु करून तुम्ही लाखो रुपये कमावू शकतात.

1. फटका बिझनेस
फेस्टिव सीझनमध्ये फटाका स्टॉल सुरु करून तुम्ही लाखो रुपये कमावू शकतात. विशेष म्हणजे तुमचा बिझनेस छोटा असल्याने याला परवान्याची देखील आवश्यकता नसते. फक्त तुम्हाला सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे लागते.

तुम्ही 100 किलो ते 600 किलोपर्यंत फटक्यांची ऑर्डर दिले असेल तर पोलिस स्टेशनमधून तुम्हाला तात्पुरता परवाना घ्यावा लागतो. परवान्यासाठी आता ऑनलाइन देखील अर्ज करता येतो. सर्व परवाने पोलिस आयुक्त कार्यालयातून दिले जातात. तात्पुरत्या परवान्यावर तुम्ही भारतीय, चायनीज फटाक्यांची विक्री करू शकतात.

100 किलो पर्यंतच्या फटाक्यांसाठी पक्के दुकान अथवा शेडची आवश्यकता नसते. मेन मार्केटपासून तुमचे फटका स्टॉल 15 मीटर अंतरावर असावा. दुकान अथवा शेडमध्ये ज्वलनशील पदार्थ नसावे. परवाना काढताना दुकान अथवा मालकाचा ना हरकतीचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे. तसेच दुकानदाराचे छायाचित्र आवश्यक असते.

असा सुरु करा बिझनेस...
फटका डिलर्सकडून तुम्ही फटाके खरेदी करु शकतात. जवळपास सर्व डिलर्स चायनीज व भारतीय फटाक्यांची विक्री करतात. जर तुम्हाला जास्त माल मागवायचा असेल तर फटाक्यांचा गड मानले जाणार्‍या तमिळनाडूतील शिवकाशी येथील कंपनीतून मागवू शकतात. रीटेलरला चीनमधील 35 ते 50 टक्के मार्जिन मिळते. भारतीय फटाक्यांवर 30 ते 35 टक्के मार्जिन मिळते. 50 हजार रुपयांत हा बिझनेस सुरु करता येतो.

पुढील स्लाइडवर वाचा, दिवाळीत कमी गुंतवणुकीत सुरु केले जाणारे छोट्या बिझनेसविषयी...