आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताला स्मार्टफोन हब बनवण्यात कुशल कामगार, सुटेभाग कमतरतेची अडचण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताला स्मार्टफोन उत्पादनाचे हब बनवण्यात कुशल कामगार आणि सुट्या भागाची कमतरता ही सर्वात मोठी अडचण आहे. कर व्यवस्थेतील किचकटपणा हीदेखील एक समस्या आहे. गेल्या आठवड्यात ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’मध्ये आलेल्या विदेशी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी विशेष चर्चासत्रात असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, भारतात महागडे चिप-सेट, कॅमेरा आणि इतर मोठे पार्ट््स बनत नाहीत, तर केवळ ५ टक्के पार्ट््सची निर्मिती होते. फोन बनवण्यासाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते, मात्र यामध्ये गुंतवणूक होताना दिसत नाही. कंपन्यांना जीएसटी परताव्याची लांबलचक प्रक्रिया अडचणीची वाटते. यामुळे पुरवठादारांना उशिराने पैसे मिळतील. भारत जगातील स्मार्टफोनचा सर्वात तेजीने वाढत असलेला बाजार आहे. येथील केवळ ३५ ते ४० टक्के मोबाइल फोन स्मार्टफोन आहेत.  

उत्पादनासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता असल्याचे चायनीज चिप मेकर ‘स्प्रेडट्रम’चे भारतातील प्रमुख नीरज शर्मा यांनी म्हटले आहे. याशिवाय कंपन्या संशोधन करू शकत नाहीत. डिझाइन विकसित करण्यासाठी मजबूत स्थानिक कंपन्यांची गरज असल्याचेही ते म्हणाले. तैवानच्या फॉक्सकॉनने ऑगस्ट २०१५ मध्ये महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पाची घोषणा केली होती. यामुळे ५०,००० लोकांना रोजगार मिळणार असल्याचेही कंपनीने म्हटले होते. मात्र, आतापर्यंत कंपनीला जामीन देण्याचा निर्णयच झालेला नाही. फॉक्सकॉनही जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक आहे. ही आयफोन आणि आयपॅडदेखील बनवते.  

भारतात केवळ  हेडफोन्स चार्जर बनतात
तंत्रज्ञान संशोधन संस्था असलेल्या काउंटर पॉइंटनुसार आयात केलेले फोन करामुळे महाग पडतात. त्यामुळे त्या फोनची असेंब्लिंग (बांधणी) येथे केली जाते. भारतात पार्टच्या नावावर केवळ हेडफोन्स आणि चार्जर बनतात. फोनच्या किमतीत याची किंमत केवळ ५% असते. 

विदेशी अधिकाऱ्यांनी सांगितल्या प्रमुख ३ समस्या
बांधणीच योग्य : सध्या भारत स्मार्टफोन बनवण्याची जागा नाही. कुशल अभियंते आणि पार्ट बनवणारे स्थानिक कमी आहेत. 
कर वाद : हेदेखील मोठे कारण आहे. नोकियाचे उदाहरण समोर आहे. वादानंतर नोकियाने तामिळनाडूमधील प्रकल्प बंद केला होता. 
कामगारांचे आंदोलन : हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. ओप्पोच्या प्रकल्पाचे ताजे उदाहरण आहे. या वर्षी झालेल्या वादानंतर या प्रकल्पातील कामगारांनी ‘काम बंद’ आंदोलन केले होते.

आम्ही टप्प्याटप्प्याने पुढे जात आहोत 
सरकार स्मार्टफोन उत्पादनात टप्प्याटप्प्याने पुढे जात असल्याचे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. यामध्ये दरवर्षी वाढ होत राहणार आहे. आम्ही असेंब्लिंग म्हणजेच बांधणीला सुरुवात केली आहे. हळूहळू यात वाढ करत जाणार आहोत. वर्ष २०१६ मध्ये “फेज्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रोग्राम’ सुरू झाला होता आणि २०२० पर्यंत मोठे पार्ट उत्पादित करण्याची योजना आहे.
बातम्या आणखी आहेत...