जगातील सगळ्यात मोठे सर्च इंजिन '
गुगल'च्या सीईओपदी नुकतीच भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांची निवड झाली. जगात भारतीयांच्या कर्तुत्त्वावर जितका विश्वास आहे, तितका कदाचित दुसर्या देशातील तरुणांवर नसावा. कारण, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मागील वर्षी अमेरिकेतील तरुणाईला एक इशारा दिला होता. तो म्हणजे, 'स्पर्धेच्या युगात स्वत:मध्ये मोठी सुधारणा करावी लागणार आहे. भारतीय तरुणांनी जगाच्या पाठीवर कर्तुत्त्व सिद्ध करुन दाखवले आहे. वेळीच सुधारणा दाखवली नाही तर भविष्यात भारतीय तरुण तुम्हाला एकही संधी मिळू देणार नाहीत.'
गुगलमध्ये सुंदर पिचाई व मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला या सारख्या अनेक इंडियन्सनी जागतिक पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. सुंदर पिचाई यांना गुगलने 50 मिलियन डॉलरचे वार्षिक पॅकेज दिले आहे. तुम्हाला माहीत आहे का? जगातील दिग्गज कंपन्यांमध्ये कर्तुत्त्व सिद्ध करणारे हे इंडियन्स कोण आहेत?
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला टॉप-10 भारतीय वंशाचे सीईओ आणि त्याच्या वार्षिक पॅकेजविषयी माहिती देत आहोत...