आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sociology Economic Caste Census Says Almost All Rural Households Earn 200 Rupees

एका बाजुला दारिद्रय तर दुसर्‍या बाजुला चंगळ, फक्त दोनशे रुपयांत होते गुजराण!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतात लोकसंख्याच्या एक तृतीयांश लोक पाच हजार रुपयांत महिनाभर गुजराण करतात. ग्रामीण भारतात तर चित्र आणखीच गंभीर आहे. ग्रामीण भागातील लोक फक्त 200 रुपयांत संपूर्ण महिन्याचा खर्च भागवतात. सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणनेत ही माहिती समोर आली आहे.

भारतात एका बाजुला दारिद्रय तर दुसर्‍या बाजुला चंगळ असे चित्र आहे. मात्र, गाव असो अथवा शहर 200 रुपये ही रक्कम किती मोठी आणि महत्त्वाची आहे, हे आम्ही आज आपल्याला या पॅकेजमधून सांगणार आहोत.

74% ग्रामीण कुटुंबियांचा आर्थिक स्रोत- शेती किंवा मोलमजुरी
सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणनाच्या आकडेवारीनुसार, भारतात 74 टक्के ग्रामीण कुटुंबे फक्त 200 रुपयांत आपला गुजराण करतात. मोलमजुरी किंवा शेती हे या लोकांचा आर्थिक स्रोत आहे. विशेष म्हणजे 200 रुपये ही त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम आहे.

डॉक्टरांचे तपासणी शुल्क
देशातील बहुतांश रुग्‍णालयात डॉक्टरांचे तपासणी शुल्क किमान 200 रुपये आहे. मात्र, देशातील काही भागातील लोक 200 रुपयांत एक महिना गुजराण करतात. ते एकाच वेळी दोनशे रुपये कसे काय देऊ शकतात. ही प्रचंड तफावत भारतात सध्या दिसत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, 200 रुपयांत आणखी कोणती कामे होतात...
टीप: छायाचित्रांचा वापर फक्त सादरीकरणासाठी करण्‍यात आला आहे.