आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन टेलिकॉम कंपन्या साैर ऊर्जेवर करणार गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तीन टेलिकॉम कंपन्यांनी सौरऊर्जा प्रकल्पात २० अब्ज डॉलर (१.२८ लाख कोटी रुपये) ची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये जपानची टेलिकॉम कंपनी सॉफ्टबँक, भारतातील भारती इंटरप्रायझेस आणि दूरसंचार उपकरण बनवणारी तैवानची फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या देशात २० गीगाहर्टचे प्रकल्प उभे करणार आहेत.

या गुंतवणुकीसाठी तिन्ही कंपन्या एसबीजी क्निनटेक लिमिटेड नावाने संयुक्त उपक्रम बनवणार आहे. यात सॉफ्टबँकची सर्वात जास्त भागीदारी असणार आहे. भारती आणि फॉक्सकाॅनची भागीदारी त्या तुलनेत कमी असेल. कंपनी या प्रकल्पासाठी उपकरणेदेखील बनवणार असल्याची माहिती सॉफ्टबँकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मासायोशी सोन यांनी दिली. या प्रकल्पाचे कार्यकारी अध्यक्ष मनोज कोहली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रमण नंदा राहतील, अशी माहिती भारती इंटरप्रायझेसचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी दिली. कोहली याआधी एअरटेलचे भारत आणि आफ्रिकेत व्यवसाय प्रमुख होते. त्यांनी नुकताच राजीनामा दिला असून नंदा हे सॉफ्टबँक सल्लागार आहेत.

याआधीदेखील सॉफ्टबँकने भारतात दहा वर्षांत १० अब्ज डॉलर (६४,००० कोटी रुपये) गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. गेल्या ९ महिन्यांत कंपनीने ६,४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती सोन यांनी दिली. त्यांनी सांगितले की, जपानच्या तुलनेत भारतात सूर्यप्रकाश दुप्पट असतो. तसेच येथे जपानपेक्षा अर्ध्या खर्चात सौरऊर्जा प्रकल्प उभा राहतो. त्यामुळेच येथे सौरऊर्जेवर पैसे लावणे हा "बिझनेस सेन्स' असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीचे अधिग्रहण झाल्यावर प्रकल्पाला सुरुवात होणार आहे.

मायक्रोमॅक्सची गुंतवणूक
स्मार्टफोन बनवणारी कंपनी मायक्रोमॅक्स इन्फर्मेटिक्सने मोबाइल ट्रॅव्हल सर्च कंपनी इक्सिगोमध्ये गुंतवणुकीची घोषणा केली आहे. मात्र, ही गुंतवणूक कितीची असेल याची आकडेवारी सांगण्यास कंपनीने नकार दिला आहे. मात्र, २० कंपन्यांमध्ये दोन कोटी डॉलर (१२८ कोटी)च्या गुंतवणुकीची घोषणा कंपनीने आधीच केली होती. ही गंुतवणूक त्याचाच एक भाग असल्याचे समजते. या प्रकारच्या आणखी काही प्रकल्पांची घोषणा येत्या काळात करणार असल्याची माहिती मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी दिली. या संयुक्त भागीदारीमुळे इक्सिगोला एका वर्षात ३ कोटी नवीन ग्राहक मिळण्याची आशा आहे. ही कंपनी पर्यटकांसाठी पर्यटनाची रूपरेषा, सर्वात स्वस्त तिकीट आणि कॅब, हॉटेल बुकिंग करण्यासाठी मदत करते.

कार्लाइलची ३,२०० कोटींची गंुतवणूक
अमेरिकेतील खासगी इक्विटी (पीई) संस्था कार्लाइन ग्रुपने मॅग्ना एनर्जी लि. मध्ये ५० कोटी डॉलर (३,२०० कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. भारतात तेल किंवा गॅस क्षेत्रात कोणत्याही एकाच कंपनीच्या वतीने करण्यात आलेल्या गुंतवणुकीत ही सर्वात जास्त गुंतवणूक आहे. मॅग्ना एनर्जी एक नवी पेट्रोलियम कंपनी आहे. ती तेल िकंवा गॅस उत्पादनात उतरण्याची तयारी करत आहे. यासाठी परवाना घेण्याची प्रक्रिया कंपनीच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. सरकार याच वर्षी गॅस, तेलक्षेत्रातील लिलाव करणार आहे. मॅग्नाची स्थापना राजस्थानमध्ये तेल संशोधक माइक वाट्स यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...