आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जपानच्या सॉफ्ट बँकेचे निकेश अरोरा अध्यक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोकियो- निकेश अरोरा जपानच्या सॉफ्टबँकेचे नवे अध्यक्ष आणि सीओओ झाले आहेत. भविष्यात त्यांच्याकडे कंपनीच्या सीईओपदाची जबाबदारी सोपविली जाऊ शकते. कंपनीचे संस्थापक आणि सीईओ मासायोशी सोन यांनी ही घोषणा केली. निकेश १९ जून रोजी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. आतापर्यंत सोन यांच्याकडेच हे पद त्यांच्याकडे होते. साधारण ४.७ लाख कोटी रुपयांची सॉफ्टबँक जपानची प्रमुख टेलीकॉम कंपनी आहे.
सोन म्हणाले, मी नऊ महिन्यांपर्यंत निकेशसोबत काम केल्यानंतर ते सीईओ पदाचे मजबूत दावेदार अाहेत. ते माझ्यापेक्षा दहा वर्षांनी लहान आहेत. मात्र, माझ्यापेक्षा जास्त पात्र आहेत. मात्र, त्याचबरोबर नजीकच्या भविष्यात आपण निवृत्तही होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सोन कंपनीचे अध्यक्षही आहेत.
निकेश पेप्सिकोच्या इंद्रा नुई, मायक्रोसॉफ्टचे सत्या नाडेला, मास्टरकार्डचे अजय बंगा आणि एडोबीचे शांतनु नारायण यांच्यासोबत बहुराष्ट्रीय कंपन्यांची जबाबदारी सांभाळणाऱ्या भारतीय वंशाच्या सीईओच्या रांगेत ते आले आहेत. निकेश यांनी आयआयटी-बीएचयू, बोस्टन कॉलेज आणि नॉर्थईस्टर्न विद्यापीठातून शिक्षण केले आहे. पत्नी आयशा शापर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आहेत. गेल्या वर्षी झालेल्या विवाह सोहळ्यास देश-विदेशातील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाले होते.
बातम्या आणखी आहेत...