मुंबई- देशातील सतरा बँकांचे ९००० कोटींचे कर्ज थकवून लंडनला परागंदा झालेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. कर्ज फसवणुकीशी संबंधित मनी लाँडरिंगची चौकशी करण्यासाठी विशेष न्यायालयाने मल्ल्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याशी संबंधित सुनावणी करत असलेल्या विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. आर. भावके यांनी सोमवारी मल्ल्यांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले. मद्यसम्राट मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये आहेत. ईडीने तीन समन्स बजावूनही ते मुंबईत ईडीच्या तपास अधिकाऱ्यासमोर हजर झाले नव्हते. मल्ल्यांनी तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर राहण्यासाठी मेपर्यंतची वेळ मागितली आहे. यापूर्वी शुक्रवारी ईडीच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्रालयाने मल्ल्यांचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट निलंबित केला आहे.
अनेक वेळा चौकशीसाठी बोलावूनही विजय मल्ल्या चौकशीकरता हजर राहत नाहीत. तसेच त्यांच्या कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी तपासकामी ईडीला सहकार्य करत नसल्याचा युक्तिवाद करत अॅड. हितेन वेणेगावकर यांनी शुक्रवारी मल्ल्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वाॅरंट जारी करण्याची विनंती केली होती. तसेच आयडीबीआय बँकेने दिलेल्या या ९०० कोटींच्या कर्जाच्या रकमेतून ४३० कोटी खर्च करून मल्ल्या यांनी परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचेही ईडीच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र किंगफिशरने हा आरोप फेटाळून लावला.
आयडीबीआय बँकेकडून घेतलेल्या ९०० कोटी रुपयांच्या कर्जातील ४३० कोटी रुपये
बेकायदेशीररीत्या काढून मल्ल्यांनी परदेशात संपत्ती खरेदी केली, असा ईडीचा दावा आहे.
किंगफिशरने मात्र हा दावा खोटा असल्याचे सांगितले.
अटकेसाठी अाता रेड कॉर्नर नोटीस बजावणेही शक्य
अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात ईडी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इंटरपोलला मल्ल्यांविरोधात रेड कॉर्नर नोटीस काढण्याची विनंती करू शकते. सध्या मल्ल्या हे लंडन येथे असून या रेड कॉर्नर नोटीसनंतर मल्ल्या यांना त्यांच्या पासपोर्टवर कुठेही प्रवास करता येणार नाही.
माल्यांनी कर्जाच्या रकमेतून खरेदी केली प्रॉपर्टी...
-विजय माल्या यांच्या यूबी ग्रुपने कर्जाच्या रकमेतून प्रॉपर्टी खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला होता. ईडीचा आरोप कोर्टाने फेटाळला आहे.
-किंगफिशर एअरलाइन्सने या आरोपांविरोधात विशेष PMLA कोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती. ईडीनुसार, माल्या यांनी IDBIकडून 430 कोटी रुपये कर्ज घेतले होते. या रकमेतून माल्यांनी विदेशात प्रॉपर्टी खरेदी केली. याप्रकरणी ईडी मनी लॉन्ड्रिंगची चौकणी करत आहे.
कोर्टात काय म्हणाले विजय माल्यांचे वकील?
- विशेष कोर्टात सोमवारी किंगफिशर एअरलाइन्सचे वकील प्रणव बाडेका यांनी ईडीने केलेले आरोप फेटाळले
- बाडेका यांनी कोर्टात सांगितले की, ईडीचे आरोप निराधार आहेत. IDBI ने दिलेल्या 900 कोटी कर्जापैकी 430 कोटी रुपयांची किंगफिशरने विदेशात प्रॉपर्टी खरेदी केली. कर्जाचा वापर योग्य पद्धतीने झाल्या चे बाडेका यांनी सांगितले.
- 'किंगफिशरने 5 खोक्यात फाइल्स ईडीकडे सोपवल्या आहेत. कोर्टने या फाइलमधील दस्ताऐवज तपासावे.
पुढील स्लाइडवर वाचा, देशात आणि परदेशात त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण संपत्ती जाहीर करा- सुप्रीम कोर्ट...