आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SpiceJet च्या विमानातून फक्त एक रुपयाच्या बेस फेअरवर करा हवाई सफर!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वस्त दरात विमानप्रवास सेवा देणारी स्पाइसजेट एअरलाइन्स कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक योजनेची घोषणा केली आहे. फक्त 'एक रुपयाच्या बेस फेयर'वर स्पाइसजेटने एक लाख तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत.

या तिकिटांवर प्रवाशांकडून फक्त एक रुपया बेस फेयर आकारले जाणार आहे. स्पाइसजेटची ही योजना 15 जुलैला सकाळी 10 वाजता सुरु झाली आहे. 17 जुलै 2015 रात्री 12 वाजेपर्यत या योजनेतील तिकिट बुक करता येतील. परतीच्या प्रवासावर ही ही ऑफर लागू नसेल. तसेच प्रवाशांना टॅक्स आणि इतर शुल्क अदा करावे लागेल.

स्पाइस जेटच्या या शानदार ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना स्पाइसजेटच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरून तिकिट बुक करावे लागणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या, स्पाइस जेटच्या शानदार ऑफरविषयी...