आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या वयात करा छोटी इन्व्हेस्टमेंट, रिटायरमेंटच्या वयात व्हाल मालामाल!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भविष्यासाठी प्रत्येक व्यक्ती बचत करत असतो. परंतु, असे करत असताना आपल्या हातून कळत नकळत अशा काही चुका होत असतात. आपण करायला जातो गणपती आणि होतो हनुमान! असाच काहीसा बहुतेकांना अनुभव येत असतो. कोणत्या वर्षापासून बचत करावी. तसेच प्रत्येक महिन्याला किती बचत करावी, हेच अनेकांना माहीत नसते. त्यामुळे घाईगडबडीत आपण पैसा गुंतवतो व तेथेच आपण फसतो. आपले मोठे आर्थिक नुकसानही होते.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला वयानुसार सेविंग अर्थात बचतीचा फंडा घेवून आहे. आपण वयाच्या कोणत्या वर्षापासून गुंतवणूक करावी, तसेच प्रत्येक महिन्याला किती रक्कम गुंतवावी, याविषयी माहिती देत आहोत.
सध्याचे वय प्रत्‍येक महिन्यातील गुंतवणूक संभाव्य व्याजदर रिटायरमेंटचे वय गुंतवणूक केलेली रक्कम मिळालेले व्याज एकूण मिळणारी रक्कम
25 वर्षे 5,000 रुपये 10 टक्के 60 वर्षे 21 लाख जवळपास 1 कोटी 70 लाख रुपये जवळपास 1 कोटी 91 लाख रुपये

सध्याचे तुमचे वय 25 वर्षे आहे आणि रिटायरमेंटच्या वयात अर्थात 60 व्या वर्षी तुम्हाला 2 कोटी रुपये अपेक्षीत आहेत. यासाठी प्रत्येक महिन्याला तुम्हाला किमान पाच हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. दसादशे 10 टक्के व्याजदराने तुम्हाला रिटायरमेंटच्या वयात चांगला रिटर्न मिळेल. 'सिस्टमेटिक इनव्हेस्टमेंट प्लान' (एसआयपी)मध्ये रुपये गुंतवू शकतात. एसआयपीमध्ये जोखीम कमी आहे. त्या तुलनेत मोबदला जास्त आहे. कारण, एसआयपीच्या माध्यमातून थेट म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते.

जर, तुमचे वय 30 वर्षे असून तुम्हाला रिटायरमेंटच्या वयात दोन कोटी रुपये अपेक्षीत आहे. यासाठी तुम्हाला थोडी जास्त गुंतवणूक करावी लागेल.

पुढील स्लाइडवर वाचा, 30 व्या वर्षी बचतीसाठी असे करावे नियोजन...
बातम्या आणखी आहेत...