आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरीच सुरु करा हे पाच बिझनेस, रेग्युलर इनकम मिळवण्याची सूवर्ण संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ई-कॉमर्सच्या प्लॅटफार्मवर तुम्ही घरबसल्या आपला बिझनेस सुरु करु शकतात. या माध्यमातून तुम्ही लोणचे, होम मेड बेकरी, चॉकलेट व कॅंडल मॅन्युफॅक्चरिंगसारखे अनेक बिझनेस करू शकतात. या बिझनेसमधून तुम्ही चांगली कमाई करू शकतात. स्मार्टफोन व इंटरनेटच्या माध्यमातून तुम्ही या बिझनेसची मार्केटिंगही करू शकतात.

होम मेड लोणचे...
दिल्लीतील विष्णु गार्डनमध्ये राहाणारे नानक सिंग व त्यांची पत्नीचा लोणच्याचा बिझनेस आहे. दोघे घरच्या घरी लोणचे बनवतात. सिंग यांच्या लोणच्याला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नानक व त्यांची पत्नी स्थानिक बाजारात आपले प्रॉडक्ट्‍स विकतात. नानक यांनी घराच्या छतावर आपला बिझनेस सुरु केला आहे. लोणचे सगळ्यांना चविष्ठ लागले. त्यानंतर मागणी वाढतच गेली. शहरातील मोठ्या रिटेल चेनला आपले प्रॉडक्ट्‍स सप्लाय करतात.

तुम्ही देखील लोणचे बनवण्याचा बिझनेस घरी सुरु करू शकतात. 10 हजार रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही हा बिझनेस सुरु केला. यातून तुम्ही 25 ते 30 हजार रुपये मोबदला मिळवू शकतात. मोबदला तुमच्या प्रॉडक्ट्‍सच्या मागणी, पॅकिंग व एरियावर अवलंबून आहे. ऑनलाइन, ठोक व रिटेल मार्केटमध्ये लोणच्याची विक्री करु शकतात.

पुढील स्लाइडवर वाचा, इतर बिझनेसविषयी...
बातम्या आणखी आहेत...