आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक विकास ८ टक्क्यांच्या पार, बेरोजगारी बेसुमार : राहुल बजाज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाचा आर्थिक विकास अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वेगाने वाढत आहे यात शंकाच नाही. मात्र रोजगार संधीचा अभाव असणारा हा आर्थिक विकास काय कामाचा, असा सवाल बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी विचारला आहे. कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वृत्तांतात बजाज यांनी देशातील वाढत्या बेरोजगारीकडे लक्ष वेधले आहे.

बजाज यांनी देशातील दीर्घकालीन आर्थिक विषयाबाबत या वृत्तांतात काळजी व्यक्त केली आहे. बजाज म्हणतात, देशात दरवर्षी १२ दशलक्ष तरुण मनुष्यबळ तयार होते. हे अधिकचे मनुष्यबळ आहे. देशाने ८ टक्के दराने आर्थिक विकास दर साधला आहे यात शंका नाही. आगामी काळात हा दर ८.५ टक्क्यांवर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हे सर्व खरे असले तरी ज्या दराने आर्थिक विकास होत आहे, त्या दराने देशातील रोजगार वाढत नाही. एवढेच नव्हे तर या आर्थिक विकास दराच्या आसपासही रोजगार वाढीचा दर नाही. अलीकडील सर्वच मॅन्युफॅक्चरिंग व सेवा क्षेत्रातील रोजगारविषयक आकडेवारीत भिन्नता दिसून येते. केवळ भिन्नताच नव्हे तर रोजगारविषयक ही आकडेवारी नकारात्मक सूर आळवताना दिसते.

तणावावर प्रश्न
बजाज यांनी असमानता आणि सामाजिक तणावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रश्नावर माझ्याकडे उत्तर नसल्याचेही राहुल बजाज यांनी सांगितले. या तणावाचे आपण काय करणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

आता तरी लक्ष द्या...
आगामी काळात कौशल्य आणि बहुकार्यप्रवीण (मल्टी टास्किंग) मनुष्यबळाची देशाला गरज आहे. आजवर देशातील सर्व शाळा, महाविद्यालये तसेच तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र आता स्वातंत्र्यानंतर सात दशके उलटत असताना याकडे आवर्जून लक्ष देण्याची गरज असल्याकडे बजाज यांनी लक्ष वेधले.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...