आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टीलचे आयात शुल्क वाढवण्याची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्टीलवरील आयात शुल्कातील वाढीसोबतच ड्यूटी ड्रॉबॅक वाढवण्याची मागणी अभियांत्रिकी निर्यातदारांकडून करण्यात आली आहे. अशा प्रकारची वाढ केल्यास निर्यातीत होणारी घसरण थांबवणे कठीण जाणार आहे. मागच्या वर्षी सुमारे ७१ अब्ज डॉलरची अभियांत्रिकी क्षेत्रातील उपकरणे तसेच सुट्या भागांची निर्यात करण्यात आली होती. यंदा याचे प्रमाण घटण्याची शंका व्यक्त केली जात आहे.
इंजिनिअरिंग एक्स्पोर्ट प्रमोशन काैन्सिलचे (ईईपीसी) अध्यक्ष अनुपम शहा यांच्या मते, अभियांत्रिकी उत्पादनांच्या एकूण खर्चापैकी निम्मा खर्च फक्त स्टीलवरच होतो. आयात शुल्क वाढवल्याने स्थानिक उत्पादक मिळून भाववाढ करू शकतात. यामुळे निर्यातदारांना नुकसान होईल. ते पुढे म्हणाले की, स्थानिक स्टील उद्योगास चीनसारख्या राष्ट्रांपासून वाचवण्यासाठी आयात शुल्क वाढवणे गरजेचे आहे. मात्र, यासोबतच निर्यातदारांसाठी ड्रॉबॅक दरातही वाढ व्हायला हवी.

मागच्या वर्षी सरकारने स्टील पत्रे, स्टीलचे पाइप तसेच नळ्यांवरील आयात शुल्कात २.५ टक्क्यांची वाढ केली होती. स्टील पत्र्यावरील शुल्क ७.५ टक्क्यांहून १० टक्के करण्यात आला होता. लांब नळ्याही टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांवर नेण्यात आल्या. स्टीलच्या पत्र्यांचा उपयोग कार, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन इत्यादी बनवण्यासाठी केला जातो.
ड्यूटी ड्रॉबॅक म्हणजे काय?

एखादीवस्तू बनवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या बाबींवर उत्पादन किंवा आयात शुल्क लावले जाते. तयार वस्तूची निर्यात झाल्यास सरकार या शुल्काचा काही भाग निर्यातदारांना परत देत असते. यामुळे निर्यातदारास त्या वस्तूसाठी येणारा खर्च कमी होऊन जातो. निर्यातीला चालना देणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.
बातम्या आणखी आहेत...