आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थिती स्पष्ट होईपर्यंत वाट पाहणे योग्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेअर बाजारात गेल्या आठवड्यात प्रमुख सूचकांक आणि शेअर वाढीसह मर्यादित राहिले. गुंतवणूकदार-व्यावसायिकांनी ग्रीसमधील संकटामुळे जागितक बाजारात सुरू असलेल्या चढ-उताराकडे लक्ष दिले नाही. भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात झालेली वाढदेखील आशियाई बाजारातील कमजोर स्थितीमुळे कमी झाली. ग्रीसच्या नागरिकांनी रविवारी झालेल्या मतदानात नव्या बेलआऊट पॅकेजमध्ये युरोपीय युनियनच्या अटी मान्य करण्यास नकार दिला. या नंतर जगभरातील शेअर बाजारात पडझडीला सुरुवात झाली. मतदानाच्या निकालामुळे ग्रीसचे संकट जगातील इतर अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवू शकते आणि त्यामुळे युरो झोनमधील इतर देशांवरदेखील परिणाम होण्याची शक्यता आहे.

ग्रीसचे पंतप्रधान एलेक्सिस सिप्रास यांनी युरो झोनच्या आपतकालीन बैठकीत सहकार्य करण्याचा प्रस्ताव ठेवण्यास मंजुरी दिली आहे. ग्रीसमधून येणारी कोणतीही बातमी, मग ती चांगली असेल किंवा वाईट, जगभरातील बाजाराच्या चढ-उताराचे कारण बनणार आहे. वास्तविक पडझडीची अपेक्षा कमी असेल कारण, युरोपियन सेन्ट्रल बँक कोणत्याही नुकसानीला कमी करण्याचा प्रयत्न करेल. एकूणच सध्याची जागतिक स्थिती बरीचशी निश्चित नाही. ग्रीस संकटाव्यतिरिक्त चीनमधील बाजारात झालेली पडझड देखील जगभरातील बाजारात, विशेष करून विकसनशील देशांच्या बाजारात मोठ्या चिंतेचे कारण ठरत आहे. यामुळेच जगभरातील गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.
चीनच्या बाजारात अनेक उपाययोजना करण्यात येत असल्या तरी बाजारात पडझड होणार आहे. ही पडझड इक्विटी मार्केटसाठी पुढील संकट ठरू शकते. या व्यतिरिक्त कंपन्यांचे तीन महिन्यांतील व्यवसायाची आकडेवारी जाहीर होण्यास आता सुरुवात झाली आहे. यात काही सकारात्मक आकडे समोर येतील अशी स्थिती दिसत नाही. त्यामुळे शेअर बाजारात व्यवहार करण्याच्या आधी स्पष्ट संकेत मिळेपर्यंत "वेट अॅण्ड वॉच'च्या रणनीतीचा अवलंब करणे योग्य ठरणार आहे. युरोपियन युनियन समीटचे परिणाम आणि अमेरिकेतील बाजारावर होणारा परिणाम यावरदेखील बारीक लक्ष ठेणे आवश्यक आहे. कोणत्याही नकारात्मक परिणामांना भारतीय बाजाराला तत्काळ कमजोर करण्याचे संकेत असल्याच्या रूपात पाहिले पाहिजे.

ज्या वेळी निफ्टी ८४९१ च्या वर असेल त्यावेळी सकारात्मकता असल्याचे तांत्रिकदृष्ट्या समजावे. जर िनफ्टी या अंकाच्या खाली येऊन बंद झाला तर पडझडीचा इशारा समजावा लागेल. अशा स्थितीत याला पहिला आधार ८३८९ अंकाच्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम स्वरूपाचा आधार असेल आणि नफारूपी विक्रीमुळे हा आधार फार काळ टिकण्याची शक्यता नाही. निफ्टीला पुढचा चांगला आधार ८३३६ अंकाच्या जवळ मिळेल. या पातळीच्या जवळ थोडीफार स्थिरता दिसण्याची शक्यता आहे. जर निफ्टी याच्याही खाली येऊन बंद झाला तर त्याला पुढचा आधार ८१९१ अंकाच्या जवळ मिळेल. हा एक महत्त्वपूर्ण आधार असेल. गुंतवणूकदारांनी या पातळीवर लक्ष ठेवले पाहिजे. वास्तविक या पातळीवर कायम राहण्याची शक्यता आहे. या पातळीवरुन बाजार पुन्हा वर जायला हवा. मात्र, जर काेणत्याही कारणामुळे ही पातळी तुटली तर हा लवकरच मंदीची सुरुवात असल्याचा इशारा समजावा.

वाढीचा विचार केल्यास जोपर्यंत निफ्टी ८४९१ च्या पातळीच्या वर बंद होतो आहे, तोपर्यंत वाढीची शक्यता कायम आहे. तसे पाहिल्यास निफ्टी ८७५०-८८०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. वास्तविक निफ्टीला ८६१० अंकाच्या जवळ स्थिरता मिळेल. मात्र, ही मध्यम स्वरूपाची असेल. या नंतर ८६७१ अंकाच्या जवळ स्थिरता मिळेल, ही देखील मध्यम स्वरूपाची असेल. जर बाजार याच्याही वर बंद झाला तर, निफ्टी ८७५०-८८०० अंकाच्या पातळीवर बंद होण्याची शक्यता आहे. शेअरच्या बाबतीत या आठवड्यात टाटा मोटर्स आणि लार्सन अँड टूब्रो चांगल्या स्थितीत दिसत आहे. टाटा मोटर्सचा सध्याचा बंद भाव ४३१.५५ रुपये आहे. तर त्याचे पुढील लक्ष्य ४४५ रुपये आणि कमीत कमी ४१६ रुपये आहे. एल अॅण्ड टीचा सध्याचा बंद भाव १,११८.३५ रुपये आहे. तर पुढले लक्ष्य १८४६ रुपये आणि कमीत कमी १८११.३५ रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in