आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खराब कामगिरीचा दिसेल बाजारावर परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात निफ्टीने जवळजवळ अंदाजानुसार व्यवहार केला. निफ्टी ८६३८ अंकांच्या पातळीच्याही काही प्रमाणात वर ८६५३ च्या पातळीवर गेला. येथे विक्रीमुळे थोडा दबाव दिसून आला. देशातील बाजारात झालेली पडझड ही पी-नोट्सचे कडक नियम होण्याबाबतची चिंता तसेच चीनच्या शेअर बाजारातील पडझड यामुळे झाली होती. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या वक्तव्यानंतरही सोमवारी देशातील शेअर बाजार २ टक्के घसरणीसह बंद झाला.

सर्वोच्च न्यायालयाने काळ्या पैशावर स्थापन केलेल्या एसआयटीने शुक्रवारी दिलेल्या अहवालात पी-नोट्समध्ये गुंतवणूक करणा-या विदेशी गुंतवणूकदारांची ओळख ठेवणे तसेच याचे हस्तांतरण बंद करण्याची शिफारस केली होती. या संदर्भात केंद्र सरकार काही निर्णय घेण्याच्या भीतीने बाजारात गुंतवणुकीचे वातावरण खराब झाले होते. मात्र, अर्थमंत्र्यांनी गुंतवणुकीसंदर्भात असा कोणताच निर्णय सरकार घेणार नसल्याचे स्पष्ट केले हेाते. तसेच
पी-नोट्सबाबत पूर्ण विचार करूनच सरकार निर्णय घेणार असल्याचे जेटली यांनी सांगितले होते. ज्यांना स्वत:ची ओळख सर्वांसमोर अाणायची नाही, अशा नागरिकांमध्ये पी-नोट्स लोकप्रिय आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी या माध्यमातून बाजारात जून महिन्यापर्यंत २.७५ लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. वरील निर्णयामुळे विदेशी गुंतवणूकदार बाजारातून आपला पैसा काढू शकतात. यामुळे बाजारात मोठी पडझड होण्याची शक्यता आहे.

बाजारात पडझड होण्यामागे सोमवारी चिनी शेअर बाजारात ८.२ टक्के पडझड झाली हेदेखील दुसरे महत्त्वाचे कारण आहे. गेल्या आठ वर्षांत एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी पडझड आहे. सरकारच्या वतीने करण्यात आलेले सर्व उपाय बाजारात पसरलेली भीती घालवू शकले नाहीत. त्यातच कच्चे तेल, सोने, तांबे यासह इतर वस्तूंच्या किमतीत झालेली घट बाजारातील भीती वाढवण्यास कारणीभूत ठरली. तसेच मंगळवारपासून सुरू असलेल्या अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या बैठकीमुळे गुंतवणूकदारांनी सतर्कता बाळगणे पसंत केले. सप्टेंबरच्या अाधी पतधोरणाचा आढावा घेणारी ही बैठक असून व्याजदरात वाढ करण्याबाबत अनिश्चितता कायम आहे.
बैठकीतील सर्व चर्चा समोर येईपर्यंत गुंतवणूकदारांना वाट पाहणे योग्य वाटले. तसेच देशातील कंपन्यांचे तीन महिन्यांतील निकाल अप्रिय असणार आहेत. याचादेखील बाजारावर परिणाम होईल. वास्तविक उत्पादक आणि वाहन विक्रीचे महिन्याचे आकडे बाजाराला प्रभावित करू शकतात. याची आकडेवारी सकारात्मक आल्यास बाजाराला मदत मिळेल. तांत्रिकदृष्ट्या सध्या बाजार पडझडीच्या टप्प्यावर आहे. अशा स्थितीत निफ्टीला पहिला आधार ८३१३ अंकांच्या जवळपास मिळेल, तो सध्याच्या पातळीच्या बराच जवळ आहे. जर पडझड अशीच कायम राहिली आणि आधार निघाला तर अशा स्थितीत पुढील आधार हा ८१९१ अंकांच्या
जवळ मिळण्याची शक्यता आहे. हा एक महत्त्वपूर्ण आधार ठरण्याची शक्यता आहे. यासाठी स्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर निफ्टी या पातळीच्या खाली बंद झाला तर तो ८००० च्याही खाली जाण्याची शक्यता आहे.
अशा स्थितीत त्याला पुढील आधार हा ७९३९ अंकांच्या जवळपास मिळेल. यात वाढ होण्याचा विचार केल्यास निफ्टीला पहिला रेझिस्टन्स ८४२४ अंकांच्या जवळ मिळेल, जो की महत्त्वपूर्ण
आधार असेल. निफ्टीने चांगल्या स्थितीत ही पातळी पार केली तर त्याला पुढचा रेझिस्टन्स ८५०१ अंकांच्या जवळ मिळेल. ही पातळी महत्त्वाची असेल. शेअरचा विचार केल्यास या आठवड्यात टायटन कंपनी आणि टाटा मोटर्स चांगल्या स्थितीत दिसत आहेत. टायटनचा
सध्याचा बंद भाव ३४१.१० रुपये आहे, तर पुढील लक्ष्य ३४९ रुपये आणि कमीत कमी ३३६ रुपये आहे. टाटा मोटर्सचा बंद भाव ३७०.१० रुपये आहे, तर लक्ष्य ३७८ रुपये आणि कमीत कमी ३६४ रुपये आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in