आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफ्टी ८३३८ च्या पुढे जाणे आवश्यक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात देशातील शेअर बाजार वाढीसह बंद झाला. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि कंपन्यांची जाहीर झालेली आकडेवारी कमी-जास्त असल्यामुळे बाजारात सावधगिरी दिसून आली. मात्र, पैसे गुंतवणे सुरूच राहिल्यामुळे वाढीचे वातावरण कायम राहिले. बिहार विधानसभा निवडणुकीचा परिणाम बाजारावर पडण्याची शक्यता असल्यामुळे बाजारात चिंतेचे वातावरण आहे. एकूणच बाजारात विश्वास कमी असला तरी वाढ कायम ठेवण्यात बाजाराला यश आले आहे. यामुळेच निफ्टीची सर्वात मजबूत रेझिस्टन्स असलेली पातळी ८३३८ च्या पुढे गेलेली नसल्याने बाजारात मर्यादित वाढ होताना दिसत आहे.

जागतिक पातळीवर चीनचा विकासदर कमी झाल्यामुळे चिंता उपस्थित झाली आहे. हीच बातमी आशियाई बाजारात पडझडीचे कारण बनली. जागतिक बाजारात आर्थिक संकट उभे राहिल्यानंतर चीनचा विकासदर पहिल्यांदाच ७ टक्क्यांच्या खाली आला आहे. थोड्याफार प्रमाणात गुंतवणूक कमी झाल्यामुळेदेखील चीनचा विकासदर कमी झाला आहे. गुंतवणुकीत वाढ करण्यासाठी आता चीन सरकाच्या समोर व्याजदर कमी करण्यासारखे उपाय करण्याचा दबाव वाढला आहे. जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत ६.९ टक्क्यांच्या गतीने वाढली आहे. ही आकडेवारी गेल्या तीन महिन्यांत मिळवलेल्या ७ टक्के विकासदरापेक्षा कमी असून ६.८ टक्क्यांच्या वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा जास्त आहे. अशा स्थितीत पडझडीचा परिणाम चीनच्या विकासदरावर होणारच नाही असे म्हणणे अवघड आहे. तज्ज्ञांनी तर २०१६ मध्येदेखील पडझडीची शक्यता वर्तवली आहे.

जीडीपी वाढचा दर आणि चीनच्या उद्योग उत्पादनातदेखील सप्टेंबर महिन्यात ५.७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मात्र, आधी वर्तवण्यात आलेल्या ६ टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा हे कमीच आहे. या वर्षी पहिल्या नऊ महिन्यांत "फिक्स्ड असेट इन्व्हेस्टमेंट' (एफएआय) १०.३ टक्क्यांनी घटले आहे. आधी वर्तवण्यात आलेल्या १०.८ टक्के अंदाजापेक्षा ही आकडेवारी कमी आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ खर्च वातावरणाच्या विरुद्ध आहे. तो १०.९ टक्के वार्षिक याप्रमाणे वाढला आहे. मात्र, याविषयी आधी वर्तवण्यात आलेल्या १०.८ टक्के अंदाजापेक्षा तो बरा आहे. यावरून चीनच्या अर्थव्यवस्थेवर सध्या दबाव असल्याचे दिसून येत आहे. पुढील काही महिन्यांत यातून सुटका होण्याची शक्यतादेखील दिसत नाही. आशियाई बाजारात सोमवारी झालेल्या पडझडीसाठी ही कारणे पुरेशी होती. यामुळे तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भारतीय बाजारातील वाढीला मंगळवारी ब्रेक लावला. चीनव्यतिरिक्त तेल आणि इतर कमोडिटीच्या किमती कमी झाल्यामुळेदेखील बाजारात सुरू असलेल्या पडझडीला आणखी मदतच दिली. देशांतर्गत बातमीदेखील तेवढी चांगली नाही. सप्टेंबर महिन्यात निर्यातीत २४ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे. तसे पाहिले तर व्यापार घाटादेखील काही प्रमाणात कमी होऊन १०.४८ अब्ज डॉलर झाला आहे, जो ऑगस्टमध्ये १२.४८ अब्ज डॉलर होता. एकूणच आर्थिकबाबत गेल्या आठवड्यात काही विशेष घटना घडलेली नाही.

पुढील काळात निफ्टीला पुढचा रेजिस्टन्स ८३३८ अंकाच्या जवळपास मिळेल. जोपर्यंत निफ्टी चांगल्या व्हॉल्यूमसोबत या पातळीच्या पुढे जात नाही तोपर्यंत बाजारावर दबात राहील. चांगल्या व्हॉल्यूमसह निफ्टी या पातळीच्या वरती जाण्यास यशस्वी झाला तर बाजाराचे वातावरण सकारात्मक होईल. अशा स्थितीत कमी कालावधीसाठी रॅली दिसू शकते.
पडझडीत निफ्टीला पहिला आधार ८१८५ अंकांच्या जवळपास मिळेल. हा एक मध्यम आधार असेल. मात्र, बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यास निफ्टी हा आधार तोडून खाली येऊ शकतो. त्याला पुढचा आधार ८०९१ अंकाच्या जवळपास मिळेल. या आठवड्यासाठी हा निफ्टीला मिळालेला मजबूत आधार असेल. या पातळीवर लक्ष ठेवावे लागणार आहे. निफ्टी या पातळीच्या खाली येऊन बंद झाला तर निफ्टीला पुढचा आधार ८००२ अंकांच्या जवळपास मिळेल.

शेअरमध्ये या आठवड्यात कोटक महिंद्रा बँक आणि आयडिया सेल्यूलर चांगल्या स्थितीत दिसत आहे. कोटक महिंद्राचा सध्याचा बंद भाव ६५४.०५ रुपये आहे. तो ६६२ रुपयांपर्यंत वाढ मिळवू शकतो. खाली ६४६ रुपयांवर त्याला आधार आहे. आयडिया सेल्यूलरचा बंद भाव १५१.५५ रुपये आहे. तो १५६ रुपयांपर्यंत वाढू शकतो. त्याला १४६ रुपयांवर आधार आहे.

लेखक तांत्रिक विश्लेषक व moneyvistas.com चे सीईओ आहेत. vipul.verma@dbcorp.in