आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर महिन्याला 500 रुपये करा INVEST, तुम्ही व्हाल मालामाल; असे करा नियोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शेअर मार्केट म्हणजे गुंतागुंत आणि घाट्याचा सौदा, असा गैरसमज बर्‍याच जणांनी करून घेतला आहे. परिणामी बहुतांश लोक शेअर मार्केटपासून लांब पळतात. गुंतवणूक करत नाहीत. गुंतवणूक करणार्‍यांपैकी काही जाणकार लोकच लाभ मिळवतात, असे दिसून आले आहे.
मार्केट एक्स्पर्ट्सनुसार, स्टॉक्समध्ये गुंतवणुकीचे नियम अत्यंत सोपे आहेत. ते व्यवस्थित समजून घेतल्यास मार्केटमधून कोट्यवधी रुपये कमावणे आता काही कठीण गोष्ट राहिलेली नाही. छोटी रक्कम प्रति महिना नियमित गुंतवून तुम्ही मोठा लाभ मिळवू शकतात.

या शेअरमध्ये छोटी गुंतवणूक करून मिळू शकतो मोठा लाभ...
'इन्फोसिस'चा शेअर 1993 मध्ये 145 रुपयांवर लिस्ट झाला होता. 1993 मध्ये शेअरमध्ये गुंतवलेले 10 हजार रुपयांचे आज जवळपास दोन कोटी रुपये झाले आहे. दीर्घ मुदतीत गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना शेअरसोबत डिव्हिडेंड व बोनसचा लाभ मिळतो. 2000 पासून कंपनीने 30 पेक्षा जास्त वेळा गुंतवणूकदारांना डिव्हिडेंड दिला आहे. यासोबतच 2000 पसून 4 वेळा बोनस शेअरची घोषणाही केली आहे.

दुसरीकडे, 2010 मध्ये 'सिम्फनी'चा शेअर 42 रुपयांच्या पातळीवर होता. सद्यस्थिती तो 2,413 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. याचा अर्थ असा की, त्या वर्षात केलेली 6000 रुपयांची गुंतवणूक आज 3.5 लाख रुपयांवर पोहोचली आहे. 2012 नंतर कंपनीने आपल्या शेअरधारकांना 6 वेळा डिव्हिडेंड दिला आहे.

1991पासून आतापर्यंत 30 पेक्षा जास्त कंपन्यांनी आपल्या शेअरधारकांना गुंतवलेल्या रकमेच्या 30 पट जास्त लाभ दिला आहे. अर्थात 1000 रुपये गुंतवले असतीत तर ते आज 30 हजार रुपये झाले आहे. या शेअर्समध्ये हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, एचडीएफसी, महिंद्रा अॅण्‍ड महिंद्रा, एचयूएलचा समावेश आहे. या शेअर्समध्ये स्थिर गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांना जास्त लाभ मिळाला आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, ही कुटनीती ठरवल्यास मिळू शकतो जास्त लाभ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...