आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्तमानपत्र विक्रीने सुरुवात, एमजीएम स्टुडिओ केला खरेदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किर्क केरकोरिअन यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांचे अब्जाधीश होणे एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखेच आहे. या अमेरिकन कर्तृत्ववान अब्जाधीशाने चित्रपट, विमान कंपनी, कॅसिनो आणि हॉटेल उद्योगाच्या माध्यमातून आपल्या करिअरला उत्तुंग ठिकाणी नेले. त्यांनी आठवीत असताना शिक्षण सोडले. बॉक्सर म्हणून सुरुवात केली. नंतर दुसऱ्या महायुद्धात सामील झाले. युद्ध वैमानिकांना प्रशिक्षण देत असत. लास वेगासमध्ये जमिनी विकत घेतल्या. सात वर्षांनंतर येथेच एमजीएम ग्रँड हॉटेल्स उभारली. नंतर चित्रपट स्टुडिओ खरेदी केला. कॅसिनो सुरू केला. २०११ मध्ये एमजीएम रिसॉर्ट इंटरनॅशनलच्या व्यवस्थापक मंडळावरून त्यांनी राजीनामा दिला. मात्र, २०१५ मध्ये वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्याकडे एमजीएमचे सर्वाधिक १९% भाग होते. त्यांची एकूण संपत्ती ४.२ अब्ज डॉलर्स आहे.  
 
कॅलिफोर्नियातीला गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वयाच्या ९ व्या वर्षापासून ते काम करू लागले. तेव्हा ते वर्तमानपत्र विकत असत. आठवीत असताना त्यांनी नोकरी सोडली. बॉक्सिंग सुरू केले. व्यावसायिक बॉक्सर बनण्याचे निश्चित केले. त्यामुळे त्यांनी स्वत:चे नाव- रायफल राइट केरकोरिअन ठेवून घेतले. त्यांनी आपल्या करिअरला गांभीर्याने घेतले होते. किशोरवयीनांच्या बॉक्सिंग स्पर्धांमध्ये ३३ पैकी  २९ सामने त्यांनी जिंकले. नंतर विमान उड्डाणाचे आकर्षण वाटू लागले. वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले. वैमानिक झाल्यानंतर त्यांनी युद्ध वैमानिकांना प्रशिक्षण देणे सुरू केले. दुसऱ्या महायुद्धानंतर वायुदलातील जुन्या मालवाहू विमानांची खरेदी केली.

त्यांना दुरुस्त करून त्यांची विक्री केली. या कमाईतून त्यांनी लॉस एंजलिसमध्ये १९४७ मध्ये चार्टर सेवा देण्यास सुरुवात केली. या दरम्यान हॉलीवूडच्या कलाकारांना घेऊन लास वेगासला ते जात. त्यांच्यासोबत येथील कॅसिनोमध्ये वेळ घालवत असत. येथे त्यांची भेट नर्तिका आणि नृत्य दिग्दर्शिका जीन मेरी हार्डीशी झाली. १९५४ मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांच्या दोन कन्या असून हे नाते ३० वर्षे टिकले. नंतर घटस्फोट झाला. चार्टर कंपनी ट्रान्स इंटरनॅशनल एअरलाइन्सला स्टडबेकर कॉर्पोरेशनमध्ये विलीन केले. याचे संचालक ते स्वत: होते. ही भागीदारी २ वर्षे टिकली. १९६४ मध्ये त्यांनी स्टडबेकर कंपनी खरेदी केली. विमान कंपनीला दोन भागांत विभाजित करून विकले. यात १०० दशलक्ष डॉलर्सचा नफा मिळाला. या पैशांना त्यांनी एअरलाइन्स गॅम्बलिंग रिझाॅर्ट आणि चित्रपट स्टुडिआेमध्ये गुंतवले. १९६९ मध्ये एमजीएमचे ४०% भाग खरेदी केले.  १९६८ मध्ये त्यांनी स्वत:चा कॅसिनो उभारला. १९६९-७०  दरम्यान मंदीच्या लाटेची झळ बसली. मोठे नुकसान सोसावे लागले. तेव्हा त्यांनी म्हटले होते की, हा खेळाचा स्वभाव आहे. हार-जीत सुरूच असते. मात्र, सामना पुन्हा होतो त्या वेळी जिंकण्याची संधी पुन्हा चालून येते.  
 
या दरम्यान एमजीएमने घोषणा केली की, लास वेगासमध्ये हॉटेल उभारले जाईल. हे जगातील सर्वात मोठे गॅम्बलिंग आणि रिसॉर्ट असेल. १९७३ मध्ये एमजीएम हॉटेलची सुरुवात झाली तेव्हा यात २००० खोल्या होत्या. वर्षभरात किर्क केरकोरिअनचे शेअर्स यात ५० % पेक्षा अधिक झाले. एमजीएमने मनोरंजन उद्योग आणि हॉटेल कॅसिनो उद्योग असे विभाजन केले. १९८६ मध्ये त्यांनी एमजीएमच्या मनोरंजन उद्योगातील शेअर्स १.५ अब्ज डॉलर्सला विकले. १९९६ मध्ये त्यांनी एमजीएमला पुन्हा एकदा १.३ अब्ज डॉलर्समध्ये अधिग्रहित केले.

- दुसऱ्या महायुद्धानंतर लष्करातील जुनी मालवाहू विमाने खरेदी करून त्यांना दुरुस्त करून विकले.  
- फिल्म स्टुडिआे, विमान कंपनी, कॅसिनो आणि हॉटेल उभारले.  
- एमजीएमला तीन वेळा अधिग्रहित केले, एका वेळी ५०% पेक्षा अधिक भाग खरेदी केले, मृत्युसमयी ४ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती होती.
बातम्या आणखी आहेत...