आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकलवर च्यवनप्राश विकायचे रामदेव, आता नागपुरात उभारणार अब्जावधिंचा कारखाना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सायकलवर च्यवनप्राश विकणारे योगगुरु रामदेव व त्यांचे शिष्य बालकृष्ण - Divya Marathi
सायकलवर च्यवनप्राश विकणारे योगगुरु रामदेव व त्यांचे शिष्य बालकृष्ण
नागपूर- व्यक्ति श्रीमंत असो अथवा गरीब त्याला संघर्ष सुटलेला नाही. मग जगविख्यात योगगुरु रामदेव तरी त्याला कसे अपवाद ठरणार. रामदेव यांचा सुरुवातीचा काळ संघर्षपूर्ण होता. रामदेव यांनी एकेकाळी सायकलवर फिरुन च्यवनप्राश विकण्याचे काम केले आहे. अथक परिश्रमाच्या जोरावर रामदेव यांनी सातासमुद्रापार स्वत:चा ठसा उमटवला आहे. पतंजली आयुर्वेदमधून त्यांनी स्वतंत्र ओळखही निर्माण केली आहे.

राजकारणापासून सात हात लांब राहात असल्याचे रामदेव नेहमी सांगतात. मात्र, ते अप्रत्यक्षरित्या राजकारणात उडी घेतानाही दिसतात. काळापैसा परत आणण्‍याचा मुद्दा असो, राजकीय नेत्यांची प्रशंसा किंवा टीका करण्यातही ते मागे राहात नाहीत. त्यामुळेच कदाचित ते वादाच्या भोवर्‍यात सापडत असावेत.

हरियाणामधील महेंद्रगड जिल्ह्यातील अली सैयदपूर येथील रहिवासी रामदेव यांना लहानपणापासून योगाभ्यासाची आवड होती. गावात आयोजित करण्‍यात येणार्‍या योग शिबिरात ते स्वेच्छेने सहभागी व्हायचे. योग शिबिरात रामदेव बाबांच्या वयोगटातील अनेक मुले येत असत. योगाभ्यासात दिवसेंदिवस त्यांची रुचि वाढत असल्याचे पाहून त्यांनी घरदार सोडून ऋषिकेश जाण्याचा निर्णय घेतला. रामदेव यांना एकेकाळी लोक सायकलवर फिरुन च्यवनप्राश विकणारे बाबा म्हणून संबोधत असत. मात्र, आज रामदेव यांना अख्ये जग योगगुरु म्हणून ओळखते.

रामदेव सांगतात की, लहानपणी ते शेती करायचे. शाळेतही जात होते. वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत ते अभ्यासात नेहमी आघाडीवर असायचे. रामदेव लहानपणी खूप लठ्ठ होते. त्यामुळे काही मुले त्यांची मस्करीही करत असत. परंतु, रामदेव कधीही हताश झाले नाही. अभ्यासातून ते मस्करी करणार्‍या मुलांना प्रत्युत्तर देत असत. योगाभ्यासामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले.

धार्मिक टीव्ही चॅनलने मिळवून दिली ओळख...
ऋषिकेश येथील योगाभ्यास पूर्ण केल्यानंतर रामदेव एका धार्मिक टीव्ही चॅनलवर योगाभ्यासाचे धडे द्यायला सुरुवात केली व याच माध्यमातून नंतर ते घरा-घरात पोहोचले. रामदेव यांच्या आश्रमातील आयुर्वेदीक औधषी आज प्रत्येक घरात पोहोचली आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, योगाचार्य रामदेव यांनी कशी सुरु केली पतंजलि कंपनी...