आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववीत दोनवेळा नापास आणि आज १६ व्या वर्षी दोन कंपन्यांचा मालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत राहणा-या अंगद दरयानी याची. अपार कष्ट आणि काहीतरी वेगळे करून दाखवण्याची जिद्द या महत्त्वाकांक्षेने अनेकांना यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवले आहे. नुकतेच फेसबुक पेज 'Humans of Bombay' यावर अंगदची सक्सेस स्टोरी खूपच लोकप्रिय झाली होती. आज आम्ही त्याने इतक्या कमी वेळात हे मोठे यश कसे मिळवले याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
जगण्यातून शिकणे आवडत होते, यामुळे सोडली शाळा : अंगदने शाळा याकरिता सोडली कारण त्याला जीवनाकडून शिकण्यात जास्त मजा वाटत होती. अंगदने फेसबुक पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, जेव्हा मी 9 वीच्या वर्गात होतो तेव्हा मी शाळा सोडली. कारण मला वारंवार जुन्या कन्सेप्ट शिकणे आवडत नव्हते. त्याच्या मते शालेय शिक्षणामध्ये मुले नवीन कल्पनांवर विचार करू शकत नाहीत. पुस्तकात दिलेल्या रटाळ गोष्टी पाठ कराव्या लागतात. ज्या नंतर विद्यार्थी विसरूनही जातात. अंगद नववीत दोनवेळा नापास झाला होता.
आता करत आहे डिप्लोमा : अंगदला जरी जीवनातून शिकणे आवडत असले तरी, तो आता the International Baccalaureate Diploma Programme (IBDP) हा डिप्लोमा करत आहे.
वडिलांना आणि आजोबाला मानतो हीरो : अंगद आपल्या संपूर्ण यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांना शिकवणा-या शिक्षकांना देतो. त्याने त्याच्या अंगद मेक्स डॉट कॉमवरही याची माहिती दिली आहे. त्याच्या आजोबाचे नाव कुंदनदास दरयानी आणि वडिलांचे नाव अनिल दरयानी आहे. जेव्हाही अंगदला कोणत्याही कामात अडचण येते, तेव्हा तो त्यांच्या कुटुंबीयांशी सल्ला मसलत करतो आणि त्यातून मार्ग काढतो.

लहानपणापासून बनवतो नवनवीन वस्तू, दोन कंपन्यांची केली सुरुवात अंगदने लहानपणापासूनच नवनवीन वस्तू बनवण्यास सुरुवात केली. तो जेव्हा लहान होता तेव्हा टीव्ही शो अथवा त्याच्या वडिलांच्या ऑफिसमधील इंजिनिअर्सकडून काही तरी शिकून तो नवनवीन वस्तू बनवत होता. आता वयाच्या 16 व्या वर्षी अंगदने दोन नव्या कंपन्या सुरू केल्या आहेत. या कंपन्यात उत्सुकता आणि नवीन शोध (क्यूरिअसिटी अँड इनोवेशन) ला पुढाकार देणा-या वस्तू बनवल्या जातात. एमआयटीचे प्राध्यापक डॉ. रमेश रस्करसोबत काम करताना अंगद आणि त्याच्या टीमने व्हर्च्युअल ब्रेलरसुध्दा बनवला. हा ब्रेलर कोणत्याही पीडीएफ डॉक्युमेंटला ब्रेल लिपीमध्ये कन्व्हर्ट करतो. आता त्यांच्या कंपनीने शार्कबोट थ्री डी सिस्टिम (SharkBot 3D Systems) आणि शार्क काइट्स (Shark Kits) बनवले आहे. तसेच अंगद मुंबईतील अजून एक कंपनी Maker's Asylum चे फाऊंडर सदस्यसुध्दा होता.

माजी राष्ट्रपती आणि रतन टाटांनीसुद्धा केले आहे कौतुक
अंगदने जुलै 2013 ते जानेवारी 2015 पर्यंत अनेक गरजेच्या वस्तूंवर काम केले आहे. यासाठी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि सुप्रसिध्द उद्योगपती रतन टाटा यांनीसुध्दा त्याच्या कामाची प्रशंसा केली आहे. अंगदने रतन टाटा यांच्याशी 22 जुलै 2013 रोजी मुंबईमध्ये, तर माजी राष्ट्रपती यांच्यासोबत 25 ऑक्टोबर 2010 ला हैदराबाद येथे भेट घेतली होती. अंगदने आशियातील सर्वात मोठा इव्हेंट टेडेक्स गेटवे आणि कॉर्पोरेट टेडेक्स बंगळुरुमध्ये लोकांसमोर भाषण केले आहे. याशिवाय नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरलाही त्याने भेट दिली आहे.
* संकलन : राहुल रणसुभे, औरंगाबाद.