आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाझींच्या तावडीतून सहीसलामत सुटका, आता जॉर्ज सोरोस 25 अब्ज डॉलर्सचे मालक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॉर्ज सोरोस शरणार्थींचे समर्थक आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी शरणार्थींची मालकी असणाऱ्या कंपन्यांमध्ये ५०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. युरोपातून विस्थापित झालेल्या शरणार्थींच्या मदतीसाठी ते वेळोवेळी धावून जातात.
 
शरणार्थींविषयी सहानुभूती असण्यामागे एक विशेष कारण आणि मोठी कहाणी आहे. नाझींच्या ताब्यातील हंगेरीमध्ये १९३० मध्ये सोरोस यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील यशस्वी वकील होते. त्यांनी महत्प्रयासाने लंडनमध्ये आश्रय घेतला आणि त्यानंतर ते अमेरिकेत आले. आज जॉर्जची कंपनी सोरोस फंड मॅनेजमेंट ३२ अब्ज डॉलर्सचा नफा कमावते. अमेरिकेतील यशस्वी गुंतवणूकदारांमध्ये याची गणना होते. सोरोस यांनी आपल्या कमाईतला मोठा हिस्सा आेपन सोसायटी फाउंडेशनमध्ये गुंतवला आहे. या कंपनीचे जाळे, भागीदार आणि प्रकल्प यांच्या माध्यमातून १०० देशांमध्ये आहे. नुकतेच एका मुलाखतीत सोरोस यांनी सांगितले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे प्रशासन चालवण्यात अयशस्वी ठरतील.त्यांच्या कल्पना विरोधाभासी आहेत. ते हुकूमशहा बनू शकतात.  

जॉर्ज सोरोस यांचे मूळ नाव जीरजी स्केवार्टझ होते. ते सहा वर्षांचे असताना त्यांच्या पालकांनी कुटुंबाचे आडनाव सोरोस केले. सोरोसचा अर्थ ‘खूप दूर जाणारा’असा आहे. त्यामुळेच त्यांच्या वडिलांना हे नाव पसंत पडले होते. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांनी नाव बदलले. नाझींच्या तावडीतून सुटका करवून घेताना सोरोस कुटुंबाने स्वत:ला रोमानियन ख्रिश्चन असल्याचे सांगितले. सेंडोर किस असे नाव त्यांनी सांगितले. १९४४-४५ चा तो काळ होता.
 
तेव्हा हंगेरीत ५ लाख ज्यूंची हत्या केली गेली. सोरोसच्या ज्यू कुटुंबाने बनावट ओळखपत्रे बनवली. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. या कुटुंबाने इतर काही लोकांचा जीव वाचवला. युद्धानंतर हंगेरीत कम्युनिस्ट शासन आले. तेव्हा १९४७ मध्ये सोरोस बुडापेस्ट सोडून लंडनमध्ये आले. येथे रेल्वे पोर्टर म्हणून अर्धवेळ नोकरी केली. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकण्यासाठी अर्धवेळ वाढप्याची नोकरी केली. पदवी शिक्षणानंतर नोकरी आणि मुलाखतीसाठी लंडनच्या प्रत्येक मर्चंट बँकेमध्ये अर्ज दिले. मात्र केवळ १-२ उत्तरे मिळाली. सोरोस सांगतात की हा जीवनातील सर्वात वाईट काळ होता. मुलाखतीत त्यांना अपमान सहन करावा लागला. त्यानंतर काही काळ त्यांनी फॅन्सी वस्तूच्या ठोक विक्रेत्याकडे सेल्समनची नोकरी केली. सिंगर अँड फ्राइडलँडर मर्चंट बँकेत अखेरीस त्यांना लिपिकाची नोकरी मिळाली. या बँकेचे संचालक हंगेरीचे असल्याने ही संधी मिळाली होती.  

१९५६ मध्ये ते अमेरिकेत दाखल झाले. येथे गुंतवणुकीच्या क्षेत्रात प्रवेश केला. वॉल स्ट्रीटच्या एका ब्रोकरेज फर्ममध्ये काम मिळाले.त्यानंतर १३ वर्षांनी १९६९ मध्ये आपले हेज फंड स्थापन केले. सोरोस फंड मॅनेजमेंट असे त्याचे नाव होते. त्या वेळी त्यांचे वय ४० होते. १२ दशलक्ष डॉलर्सपासून सुरुवात झाली. याला क्वांटम फंडचे नाव दिले. गुंतवणुकीमध्ये तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही यात काहीच कमावत नाही असा अर्थ होतो. कारण चांगली गुंतवणूक करणे हे कंटाळवाणे काम आहे असे सोरोस सांगतात.
 
माझे कुठे चुकते हे कळाल्यानेच मी चांगला गुंतवणूकदार झालो. जगात वाईट सत्ताधाऱ्यांमुळे गरिबी आहे असे त्यांचे मत आहे. लोकशाहीच्या आकुंचनामुळे दारिद्र्य निर्माण होते. स्वातंत्र्यावर विश्वास असेल तर याला बाजाराच्या भरवशावर सोडता येत नाही. २०१३ मध्ये सोरोसने आपल्या संपत्तीचा ४५% हिस्सा सोरोस चॅरिटेबलला दिला. ७३४ दशलक्ष डॉलर्सचा हा निधी होता.  
 
- जगातील अग्रस्थानी असलेल्या हेज फंड फर्ममध्ये याचा समावेश. जवळपास ३० अब्ज डॉलर्स फंडाचे व्यवस्थापन करणारी कंपनी.  
- १९७३ मध्ये सुरू झाल्यानंतर आतापर्यंत ३२ अब्ज डॉलर्सची कमाई केली आहे.  
- २०० कर्मचारी असलेल्या फर्मची जगभरात गुंतवणूक.
बातम्या आणखी आहेत...